पूज्य आडकोजी महाराज, गुरुनानक देव, क्रांतीनायक बीरसा मुंडा जयंती उत्सव प्रबोधनाने साजरा.

श्री गुरुदेव सेवा मंडळ सहकार नगर रामपूर यांच्या वतीने पूज्य आडकोजी महाराज, गुरुनानक देव, क्रांतीनायक बीरसा मुंडा जयंती उत्सव प्रबोधनाने साजरा.


 राजुरा (ता. प्र.): कार्तिक पौर्णिमा व प्रार्थना दिनाचे औचित्य साधून श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा-सहकार नगर रामपूर यांच्या वतीने पूज्य आडकोजी महाराज, गुरुनानक देव व क्रांतिनायक बिरसा मुंडा,यांच्या जयंती कार्यक्रमाचे  आयोजन करण्यास आले .
      सामुदायिक प्रार्थनेनी या कार्यक्रमाला सुरूवात करून. लगेच संत महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. सदर कार्यक्रमला अध्यक्ष  ह. भ. प. नामदेव महाराज आवारी, निर्मिती नगर रामपूर , तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री मोहनदास मेश्राम सर, सेवाधिकारी, गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुरा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.  मान्यवरांच्या हस्ते गुरुनानक देव, क्रांतीनायक बिरसा मुंडा, पूज्य आडकोजी महाराज, वं राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण   करण्यात आले.
   गुरुनानक देव यांचे 14 व्या शतकातील मानवतेचे विचार आजच्या पिढीला चिंतन करायला लावणारे आहे. त्या काळात त्यांनी शीख समुदायाला संघटित करूण त्यांच्यात मानवता धर्म जगवण्याचे काम केले. मात्र आज आधुनिक काळात तंत्र व यंत्राने माणूस एकमेकांच्या भौतिक दृष्ट्या खूप जवळ आला पण सामाजिक बांधिलकी पासुन दूर चालला आहे.माणसा माणसात प्रेम, आपुलकी, दयाभाव, विश्वास, सद्भावना, सद्विचार या गुणापासून माणूस दूर चालला आहे.निर्मळ मनाची व सद्विचारी माणसं आज  पहायला मिळत नाही . सेवेचे ढोंग करणारी स्वार्थी  निती ब्रष्ट मानस समजाच अधःपतन करताना दिसत आहे.म्हणून गुरुनानक देवांनी सांगितलेले तत्त्वज्ञान आजच्या युगाला प्रेरणादायी आहे. त्यांनी  'कीरत करो"(प्रामाणिकपणे जगा)"नामजपो "(खाऱ्या देवाचा म्हणजे सत्याचा जप करा)"सरबत दा सुख"(सर्वांना सुख लाभो ही कामना करा)"सेवा"(मानव समाजाची सेवा करा).या तत्वाला त्यांनी महत्व  दिले , म्हणून त्यांच्या कार्यातून आपण प्रेरित झालो पाहिजे व त्यांचे राहिलेले कार्य आपनाकडून होईल याचे आज चिंतन करण्याची व प्रत्यक्षात उतरवण्याची आज नितांत गरज आहे. सेवा, करुणा ,दया, हे गुण गुरुनानक देव यांच्या कडून शिकले पाहिजे.
"जो सुनता है , वो समजता है, और जो समजता है, वो कुच ना कूच कर सकता है असे म्हणणारे जननायक बिरसा मुंडा यांचा अन्यायाविरुद्ध लढण्याचा संघर्ष हा उल्लेखनीय आहे. आदिवासी समजला संघटित करून भरतीत स्वातंत्र्य लढ्यात  ब्रिटिशांच्या विरोधात  उभारलेला लढा आजच्या युवकांना प्रेरणा देणारा आहे . आदिवासी समाजावर होणारा अन्याय, अत्याचार, व सावकारा कडून होणारी पिळवणूक ,जमिनीची लूट यावर प्रतिबंध लावणारे क्रांतिकारक  बिरसा मुंडा होते .म्हणून त्यांना जननायक हा किताब बहाल केला गेला.
     " लाखो गुरू है जगत मे !पर एक भी नहीं कामका !सब स्वारथोकेआसरे !डंका बजाते नाम का!, विश्वास का गुरु एक है !बाकि नहीं कुछ ख्याल दे!जो खास की पहेचान दे ऐसे गुरू पर जान दे" राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुऊपदेश  करणारे विदेही संत आडकोजी महाराज त्यांची जयंती आणि पुण्यतिथी दिवस एकच आहे. ह्याच दिवसापासून सामुदायिक प्रार्थनेची सुरवात झाली म्हणून सामुदायिक प्रार्थना दिवस म्हूणन साजरा करण्यात आला .राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सामुदायिक प्रार्थनेला अनन्य साधारण महत्व दिले , ज्यामुळे संघटन शक्ती प्रबळ होते व माणूस हा समाजात विभागला न जाता मानवताधर्म जोपसण्यास कटीबद्ध होतो .असे संताचे विचार प्रमुख मार्गदर्शक मोहनदास मेश्राम, सेवाधिकारी गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुरा यांनी आपल्या मनोगतात  व्यक्त केले. व कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. नामदेव महाराज आवारी यांनी वंदनीय महाराजांनी जी सामुदायिक प्रार्थना प्रणाली लाऊन दिली . ती मानवाच्या कल्याना करीता आहे असे मत व्यक्त केले. 
     कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल चौधरी यांनी , सूत्रसंचालन अश्विनी वांढरे तर आभार सुवर्णा चोखारे यांनी मानले व राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थिती गजानन बोढे, उत्तम अवघडे, विजय वांढरे, सरोजिनी हिवरे, प्रियंका कोकोंडावर, अर्चना कुडकेलवार, लता बेले, अरुणा चौधरी, मंदा रासेकर, इंदिरा मोहितकर, मंजुषा लांडे,प्रकाश उरकुंडे, महादेव पोटे, रामप्रसाद बुटले,सुरेश बेले,परशुराम साळवे,राजेंद्र मालेकर, गजेंद्र डेरकर, मारोती सातपुते,शैलेश कावळे, सुवर्णा कावळे, माधुरी बुटले,मारोती राजूरकर, आत्माराम शेंडे, गोपाळा बुरांडे, नामदेव पेचे, बाळासाहेब गोहोकार, बाळकृष्ण ताणकर,एकनाथ कार्लेकर, रंगराव शेंडे, दिपा वांढरे, गीता मुने, अनिता डहाके, लोंढे, बुरांडे, देविदास वांढरे इत्यादी गुरुदेव उपासकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!