पर्यावरणातील स्वच्छता कार्याबद्दल स्वाब संस्थेचा सत्कार.

पर्यावरणातील स्वच्छता कार्याबद्दल स्वाब संस्थेचा सत्कार.
(चक्रधर स्वामी विचारमंच द्वारे शताब्दी समारोहात राज्यस्तरीय ग्राम स्वच्छता सोहळ्याअंतर्गत पर्यावरणातील स्वच्छता मोहिमे च्या कार्याबद्दल संस्थेचा सत्कार.)
तळोधी (बा.):
          चक्रधर स्वामी विचार मंच तळोधी बा. यांच्या शताब्दी महोत्सव निमित्ताने सुरू असलेल्या कार्यक्रमात आज स्वाब संस्थेचा विशेष सत्कार करण्यात आला. 
   चक्रधर स्वामी विचार मंच द्वारे गावागावात जाऊन स्वच्छता मोहीम राबविली जाते. त्यामुळे तळोधी येथे सुरू असलेल्या शताब्दी महोत्सव निमित्ताने राज्यस्तरीय ग्राम स्वच्छता सोहळ्याअंतर्गत तळोधी, नागभिड, सिंदेवाही, चिमूर, ब्रह्मपुरी या परिसरात येत्या दहा वर्षापासून काम करणारी 'स्वाब नेचर केअर संस्था' जंगल परिसरातील धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ, तलाव, नदी, नाले, रस्ते, परिसरातील जंगलातून जाणारे रेल्वे मार्ग या ठिकाणी प्रवास करताना, फिरायला येणारे पर्यटक जो मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा करतात हा पर्यावरणास व वन्यजीवना करीता हानिकारक असल्यामुळे हा प्लास्टिक कचरा होणारे प्रत्येक ठिकाण वर्षांतून तीनदा प्लास्टिक मुक्त पर्यावरण मोहिमेअंतर्गत स्वाब संस्थेचे संपूर्ण स्वच्छता मित्र हा कचरा गोळा करून परिसर प्लास्टिक मुक्त करीत असतात. व अशाच प्रकारे सतत प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छतेचा अभियान राबवणारी,परिसरात पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात शासकीय यंत्रणेला व परिसरातील जनतेला सुद्धा नैसर्गिक आपत्तीचे वेळी किंवा कोणत्याही कार्यात पर्यावरण संवर्धनासाठी झटणारी वृक्षारोपण,   सतत कोणत्याही शासकीय, अशासकीय यंत्रणेला झाडांचा पुरवठा करून वृक्ष लागवड करण्यास मदत, साप किंवा कोनत्या ही संकटग्रस्त वन्यजीव, पुरपरिस्थीती किंवा रस्त्यावरील अपघात, जंगलातील अपघातात पोलीस विभाग, वन विभाग असो की वैयक्तिक लोकांना सुद्धा मदतीचा हात देत सतत निस्वार्थ कार्य करणाऱ्या स्वाब संस्थेचे कार्य लक्षात घेत हा सत्कार करण्यात आला.
 हा सत्कार शाल व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, प्लास्टिक मुक्त पर्यावरण मोहीम व वन्यजीव विभाग प्रमुख छत्रपती रामटेके, उपाध्यक्ष स्वप्निल बोधनकर, कोषाध्यक्ष गोपाल कुमले, सोशल मीडिया प्रमुख अमन करकाडे, युवा विभाग प्रमुख अमीर करकाडे, शरद गभने उपस्थित होते.
   "हा सत्कार संस्थेच्या निस्वार्थपणे व सातत्याने सहकार्य करणाऱ्या संस्थेच्या प्रत्येक सदस्यांचा सत्कार आहे. आणि हे मिळालेले सत्कार आमच्या कार्याकरिता प्रेरणादायी ठरतात यामुळे या केलेल्या सत्काराबद्दल स्वाप संस्थेतर्फे त्यांचे आभार." असे संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!