संविधानातील मूलभूत कर्तव्यांचे पालन करणे सुदृढ लोकशाही साठी आवश्यक - पराग भानारकर

संविधानातील मूलभूत कर्तव्यांचे पालन करणे सुदृढ लोकशाही साठी आवश्यक - पराग भानारकर

 ⁠सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड येथे संविधान दिन साजरा

नागभीड: 
            येथील सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड येथे संविधान दिन संस्थाध्यक्ष संजय गजपुरे यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे,  मुख्य अतिथी असलेले आशिष गोंडाने सर, आशा राजूरकर मॅडम, किरण वाडीकर मॅडम, पराग भानारकर, सतीश जिवतोडे, पूजा वीर मॅडम, श्रद्धा वाढई मॅडम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करीत कार्यक्रमाची  सुरुवात करण्यात आली. 
           सर्वप्रथम 26/11 च्या भ्याड दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या पोलीस बांधवाना व नागरिकांना श्रद्धाजंली अर्पित करण्यात आली. भारतीय संविधान हे सर्वोच्च असून त्याचा प्रत्येकाला आदर असला पाहिजे या सोबतच संविधानाने दिलेले हक्क हे नागरिक म्हणून जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच संविधानाने नेमून दिलेले मूलभूत कर्तव्ये सुद्धा महत्वाचे असून त्यातूनच लोकशाहीचा पाया रचला जात असल्याने सुदृढ लोकशाही साठी मूलभूत कर्तव्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत पराग भानारकर सर यांनी व्यक्त केले. देशाचा कारभार हा सुरळीत चालावा यासाठी हे नियम कायदे तयार करून ज्या ग्रंथात समाविष्ठ करण्यात आलेले आहेत. त्या ग्रंथाला संविधान म्हणतात. असे विद्यार्थ्यांना पटवून दिले. या संविधानाचा वाचन आपण सर्वांनी केला पाहिजे व त्या दृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे असे मार्गदर्शन आशिष गोंडाने सर यांनी केले.
             या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षिका आशा राजूरकर मॅडम यांनी केले तर आभार सहा.शिक्षक सतीश जिवतोडे यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते..!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!