दुसर्याची दुचाकी वाहणे स्वत:चे सांगून विकणारे राहूल भोयर यांचे विरोधात मूल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार कारवाईचे पोलिसांचे संकेत
दुसर्याची दुचाकी वाहणे स्वत:चे सांगून विकणारे राहूल भोयर यांचे विरोधात मूल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार
कारवाईचे पोलिसांचे संकेत
मूल (प्रतिनिधी)
दुसर्यांचे मालकिचे वाहन, स्वत:चे असल्यांचे सांगून, विक्री करणारे राहूल भोयर यांचे विरोधात मूल पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे. या तक्रारीचे अनुषंगाने पोलिसांनी त्यांचे विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यांचे संकेत दिले असून, नागरीकांनी अशा तोतया इसमापासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.
आपण कंत्राटदार असून, बिले निघावयाची आहे. कामासाठी थोडी आर्थीक अडचण असल्यांचे सांगून राहूल भोयर हा आपलेकडील दुचाकी वाहन विक्री करतो. पैसे घेतल्यानंतर, स्टॅंप पेपरवर विक्री पत्र, आरटीओच्या फार्मवर सही करून, उद्या आरसीबुक व गाडी आणून देतो म्हणत निघतो तो नंतर येतच नाही. वारंवार फोन केल्यानंतरही, गाडी आणतो किंवा पैसे देतो म्हणून बनवाबनवी करीत असल्यांचे उघड झाले आहे. हा इसम गडचिरोली येथे राहत असल्याचीही माहीती आहे.
उल्लेखनीय म्हणजे, त्यांचे विरोधात पोलिसात तक्रार झाल्यानंतर, त्यांनी विक्री करून पैसे घेतलेले दुचाकी वाहन ते त्याचे नसून त्यांचे वडिलाचे नांवाने असल्यांने त्यांनी फसवणूक करून पैसे लुबाडण्याचे हेतूने हे कृत्य केल्यांचे दिसून आले आहे. या संदर्भात मूल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याकरीता तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या तोतयापासून नागरीकांनी सावध रहावे असे तक्रारकर्त्यानी आवाहन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!