गणेशा इंग्लिश स्कूल आसगाव मध्ये दिवाळीउत्सव साजरा
पवनी - प्रतिनिधी ( किशोर जुमळे )
पवनी : - दिनांक.२८ ऑक्टोंबर ला दिवाळी सणाला सुरुवात झाली त्या निमित्ताने गणेशा इंग्लिश स्कुल मध्ये बच्चा कंपनी नटूनथटून नवनवीन ड्रेस परिधान करून आले.जेवणात टिफीनमध्ये गोड पदार्थ आणले . आणि मुलांनी रंगीत वालपेपरच्या साहाय्याने कला अवगत करून कौशल्य दाखवून निरनिराळे वस्तू बनवुन आपापल्या शिक्षिकाच्या मदतीने वर्गरुमाची सजावटी करून प्रांगणात रांगोळ्या काढून वर्गखोल्या मध्ये तेलाचे दिवे लावून रोषणाई केली आणि म्हणूनच या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेमध्ये ' दिवाळी उत्सव' मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम लक्ष्मीपूजन संस्थेचे अध्यक्ष खुशालजी वैद्य सर यांनी केले. व विदयार्थांना दिवाळी सणाचे महत्त्व सांगण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांन्नी टिचरच्या मदतीने बच्चा कंपनीच्या आवडीचे फटाके फोडून सणाच्या माध्यमातून आनंद उत्सव साजरा केला. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्रमात मदत केली.तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्था अध्यक्ष खुशालजी वैद्य सर, तसेच सर्व शिक्षिका, कर्मचारी सौ.पेलणे मॅडम, सौ. पाटील मॅडम, सौ. सावरबांधे मॅडम, सौ.फुंडे मॅडम, सौ.माथूरकर मॅडम व परिचर श्रीमती उपथळे मॅडम यांनी सहकार्य केले. व कार्यक्रमाच्या समाप्तीवेळी विद्यार्थ्यांना गोड प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!