गुराख्याला मारहाण प्रकरणात वडाळा गावाकऱ्यांचे वनपरीक्षेत्र अधिकारी ताडोबा (वन्यजिव) कार्यालय प्रांगणात गावकऱ्यांचे धरणे आंदोलन... जंगलात गुरे चारणाऱ्याला मारहाण प्रकरण...।


गुराख्याला मारहाण प्रकरणात वडाळा गावाकऱ्यांचे वनपरीक्षेत्र अधिकारी ताडोबा (वन्यजिव) कार्यालय प्रांगणात गावकऱ्यांचे धरणे आंदोलन...
जंगलात गुरे चारणाऱ्याला मारहाण प्रकरण...।
 


वरोरा... जगदीश पेदाम

 ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या भद्रावती तालुक्यातील वडाळा (तु) येथील गुराखी हा दि. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी वन चराई क्षेत्रा मध्ये गावातील गुरे चारत असताना सदर क्षेत्रातील वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी राउंड वर असताना दुपारी अंदाजे १ वाजता कुठलीही विचारपूस न करता अथवा समजूत न देता अचानक पणे गुराख्याला मारहाण सुरु केली. ही घटना गुरे चराई क्षेत्रातील असल्या कारणाने त्यांनी सगळी आपबीती गावातील नागरिकांना सांगितली दरम्यान गावातील नागरिक हे सदर प्रकारामुळे संतप्त झाले असून या घटनेचा निषेध करत आज दि. २६ ऑक्टोबर ला त्यानी ग्रामपंचायत कार्यालय तर्फे वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय ( वन्यजीव ) ताडोबा कोर यांना लेखी निवेदन दिले व जो पर्यंत सदर अधिकारी यांची चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही होत नाही तो पर्यंत आम्ही या कार्यालय प्रांगनातून ठिया आंदोलन हटवणार नाही अशी ठाम भूमिका गावातील नागरिकांनी घेतली, समस्त गावकरी हे सकाळी १० ते चार वाजेपासून सदर कार्यालय प्रांगणात ठिय्या आंदोलनाला बसलेले होते..

दरम्यान आमचे प्रतिनिधी यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी यांचेशी फोन द्वारे सम्पर्क केला असता त्यांनी अशी माहिती दिली कि गुराख्याची गुरे ही कोर क्षेत्रामध्ये चरत असल्या कारणांनी मी फक्त त्याला तिथून बाहेर काढले त्याला कुठलीही मारहाण केलेली नाही. शिवाय तो या आधी  तो ३ वेळा त्या क्षेत्रामध्ये दारू पिऊन पडलेल्या अवस्थेमध्ये वन कर्मचारी यांना आढळून आला. त्याला आमच्या वाहणात टाकून आणले. व त्या क्षेत्रामध्ये रोमा वाघिणीचे वास्त्यव्य असून तिला चार पिले असल्या कारणांनी कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी त्याला दमदाटी देण्यात आली अशी माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी ताडोबा वन्यजीव वडाळा ( भाविक चिवंडे) यांनी दिली..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!