२८ ऑक्टोबरला माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली दाखल करणार नामांकन..

२८ ऑक्टोबरला माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली दाखल करणार नामांकन..


वरोरा... जगदीश पेंदाम 

 वरोरा जनसामान्यांचे नेते, प्रहार जनशक्ती पक्ष अधिकृत उमेदवार लोकप्रिय माजी नगराध्यक्ष वरोरा सोमवार दिनांक २८ ऑक्टोबरला आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. आतापर्यंत पहिले नगराध्यक्ष पदावर होऊन  अनेक ठिकाणी जाऊन विकास जनसामान्यां करीता सातत्याने कष्टकरी शेतकरी शेतमजूर महिला युवक व्यापारी यांना मदत, संघर्ष करणारे ऐतिहासिक विजयासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने  सर्व प्रमुख प्रहार नेते, पदाधिकारी, चाहत्यांमध्ये कमालीचा आनंद होत आहे... 
          सोमवार दिनांक २८ ऑक्टोबरला निवडणूक निर्णय अधिकारी वरोरा यांच्या माजी नगराध्यक्ष आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी वरोरा, भद्रावती विधानसभा क्षेत्रातील गोरगरीब जनतेचे आशिर्वाद घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी वरोरा यांच्या आलिशान सहभागृहा पासून ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रहार पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारसंघातील सर्व शेतकरी गोरगरीब शेतमजूर व्यापारी युवा वर्ग नागरिकांनी आलिशान सभागृह वरोरा येथे सकाळी ठिक १०  वाजता हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या वतीने करण्यात येत आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!