पवनी बस स्थानकात टवाळ खोरांचा नाहक त्रास
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिनांक. ०९ ऑक्टोबर २०२४ शालेय विद्यार्थिनींना पवनी बस स्थानक परिसरात नाहक त्रास देणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन आगार व्यवस्थापक कि.सु.चोपकर यांना देण्यात आले.प्राप्त माहितीनुसार पवनी शहरात शालेय असंख्य विद्यार्थिनी बाहेर गावावरुन विद्यालयात शिक्षण घेण्याकरिता एस.टी.बसने दररोज ये-जा करीत असतात.शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी बस स्थानक परिसरात एस.टी.ची वाट बघत असताना पवनी शहरातील काही रिकामटेकडे, टवाळखोर तरुण बस स्थानक परिसरात विद्यार्थिनींना अश्लील हातवारे करून नाहक त्रास देत असतात.त्यामुळे बस स्थानक परिसरात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.त्यामुळे अशा टवाळखोरांचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शहरातील सर्व मुख्याध्यापकांनी निवेदनाद्वारे केले आहे.निवेदन देते वेळी सावित्रीबाई फुले कन्या शाळेचे प्रतिनिधी अशोक गिरी,प्रणय धुरई,वैनगंगा विद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून प्रदीप घाडगे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!