हायवा फसल्यामुळे वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग 353 ई दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प...
हायवा फसल्यामुळे वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग 353 ई दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प...
वरोरा... जगदीश पेंदाम
तालुक्यातील वरोरा,शेगाव, चिमूर 353 ई महामार्गाचे सहा ते सात वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू असून महामार्गावरील अनेक ठिकाणी अर्धवट कामामुळे वाहतूकिस अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे आज सकाळी हायवा फसल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प पडली पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालवताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, रस्त्यावर मुरूम मातीचा मलबा असल्याने वाहन चालवताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे राष्ट्रीय महामार्ग 353 ई सकाळी राडेगाव जवळ हायवा फसल्यामुळे काही तासाकरीता दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प पडली यावेळी शेगाव पो. स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनात वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!