गुरुदेव भक्तांच्या जागराने दुमदुमली वरोरा नगरी.... _चला बदल घडवूया च्या आध्यात्मिक उपक्रमाला उदंड प्रतिसाद...
गुरुदेव भक्तांच्या जागराने दुमदुमली वरोरा नगरी....
वरोरा....जगदीश पेंदाम
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतीपर मौन श्रद्धांजली निमित्य श्री गुरुदेव सेवा मंडळ व डाॅ.चेतन खुटेमाटे मित्र परीवार यांच्या संयोजनातुन भव्य गुरुदेव भक्त व महिला जागर मेळाव्याचे आयोजन दि. ६ ऑक्टोबर रोजी वरोरा येथे करण्यात आले होते.
या मेळाव्याची सुरुवात वरोरा भद्रावती तालुक्यातील भजन दिंडीच्या माध्यमातुन जोड हनुमान मंदिर ते शगुन मंगल कार्यालया पर्यंत वाजत गाजत दिंडी काढून करण्यात आली. त्या मध्ये तालुक्यातील हजारो गुरुदेव भक्त व महिला,भजन मंडळे सामिल झाले ,त्या नंतर रामधून या विषयावर मदन ठेंगणे यांनी आपले विचार व्यक्त केले.
मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डाॅ.चेतन खुटेमाटे यांनी भूषविले , तर किर्तनकार व मार्गदर्शन ह.भ.प.काळे महाराज,प्रमुख वक्ते व मार्गदर्शक दिलीप सोळंकी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .
प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मन गमे,प्रा.रुपलाल कावळे,ह.भ.प.चरडे महाराज,ना.गो.थुटे,वि.गो.सोनेकर,बाळकृष्ण पडवे,श्याम लेडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्मिता सोनेकर,प्रास्ताविक चंद्रशेखर झाडे, तर आभार प्रदर्शन संतोष कुचनकर यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संदिप सोनेकर,सुधाकर खरवडे,रामभाऊ चांदेकर,भारत काळे,पलाश मदकुंटावार,अनुप पावडे,संकेत गोहकर,सुर्दशन घागी,विजय झाडे,डाॅ.विराज टोंगे,सतिश परचाके,मनोज लेडे,कडूकर,चिकटे व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते व डाॅ.चेतन खुटेमाटे मित्र परीवार यांनी अथक परिश्रम घेतले...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!