अवैध दारूचा महापूर
मौजा नवेगांव बुज. येथे राजरोसपणे अवैध दारू मिळत असल्याने अल्पवयीन मुले सुद्धा व्यसनाधीन होत आहेत, आधीच दारू सारख्या राक्षसी व्यसनामुळे कितीतरी कुटुंब उघड्यावर पडली आहेत.
दारू पिल्यावर स्वतःचे नियंत्रण ते हरवून बसतात त्यामुळे ते अर्वाच्य भाषेत बरळतात. त्याचा महिलांना व इतर सुजाण नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचा परिणाम लहान मुलांवर सुद्धा होत आहे.
पोलीस प्रशासनाने याकडे मात्र डोळेझाक केली आहे असे येथील नागरिकांचे म्हणने आहे. अवैध दारू विक्रीचा बंदोबस्त झाला नाही तर येथील जनता जन आंदोलन करेल असे आमच्या प्रतिनिधीशी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!