पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक उभारण्यात यावे - डाँ. अभिलाषाताई गावतुरे मागणी

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक उभारण्यात यावे - डाँ. अभिलाषाताई गावतुरे मागणी

  मूल शहरातील वॉर्ड क्र.1 येथे धनगर समाज हा अनेक वर्षापासून वास्तव्य करीत आहे. धनगर समाजाच्या वतीने वार्ड क्रमांक 1 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व विविध उपक्रम राबविले जातात. वार्डामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी नियोजित जागा ठरवलेली आहे त्यात चौकाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक असे नाव देण्यात आलेले आहे. नगरपरिषद मूलच्या माध्यमातून नियोजित जागेवर पुण्यश्लोक  राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारून देण्यात यावे अशी मागणी काँग्रेस नेत्या अभिलाषाताई गावतुरे यांच्या नेतृत्वात मूल मुख्याधिकारी यांना निवेदन देताना भूमिपुत्र ब्रिगेड शहराध्यक्ष नितेश मॅकलवार, धनगर समाजाचे जेष्ठ नागरिक बंडूजी मर्लावार,दीपक लंबुवार,आकाश यारेवार,आकाश आरेवार,हर्षद धुळेवार,संजय कंकलवार, आशिष यारेवार,मल्हा चिटेवार,प्रकाश मुद्रिवार, आशिष देवेवार,राजू मेडिवार,सोहन यारेवार व आदी धनगर समाज बांधव उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!