शिवसेनेने दावा सोडल्यानंतर संदीप गिऱ्हे यांची पहिली प्रतिक्रिया



बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने आपला दावा मागे घेतला आहे, ही जागा काँग्रेस लढविणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी बल्लारपूर निर्वाचन क्षेत्रातून शिवसेनेचे संदीप गिर्हे रिंगणात उतरणार असल्याची बातमी झळकली होती. कोणत्याही परिस्थितीत बल्लारपूर ची जागा शिवसेनेने लढवायचीच असा निर्धार करून प्रसंगी महाविकास आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल अशी निर्णायक भूमिका घेतली होती. तशा बातम्याही येत होत्या. मात्र काल रात्रौ झालेल्या बैठकीत ही जागा काँग्रेसला सोडण्यासाठी निर्णय झाला. मागील एक वर्षापासून, पायाला भिंगरी बांधून, विधानसभेसाठी तयारी करणारे संदीप गिऱ्हे यांचा अपेक्षाभंग झाला. लढण्याची तयारी करणाऱ्या शिवसैनिकांना शांत बसण्याचा सल्ला मिळाल्यानंतर, शिवसेनेची संबंधित व्हाट्सअप ग्रुप वर चर्चेला उधाण आला आहे. कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या दिसून येत आहे. या भावना व्हाट्सअप ग्रुप वरील चर्चेत उमटत आहे. कोणत्याही परिस्थितीत भाऊंनी अपक्ष म्हणून तरी निवडणूक लढवावीच अशी आग्रही मागणी हे शिवसैनिक करीत आहेत. परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे, भाऊंच्या मागे मतदार आहेत, त्यामुळे ही संधी सोडू नये अशा प्रकारच्या भावना शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.
आमचे प्रतिनिधीने जिल्हा शिव सेनाप्रमुख संदीप गिऱ्हे यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याचे त्यांनी मान्य केले. पुढे काय निर्णय घ्यायचं याबाबत उद्या कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन चर्चा करणार आहे, त्यानंतरच पुढील दिशा ठरवू असे सांगितले.
संदीप गिऱ्हे नेमके कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!