बल्लारपूर वरील दावा शिवसेनेने सोडला! पब्लिक पंचनामाचे भाकीत खरे ठरले



बल्लारपूर मतदारसंघातून आता काँग्रेसचा उमेदवार लढविणार हे आता स्पष्ट झाले असून शिवसेनेने या मतदारसंघावरील दावा सोडल्याची माहिती आहे.
बल्लारपूरच्या जागेच्या बदल्यात बार्गेनिंग पॉवर करून मुंबईची एक अधिकची जागा मिळवण्याचे शिवसेनेचे धोरण राहील अशी स्पष्ट बातमी पब्लिक पंचनामा ने एक महिन्यापूर्वीच प्रकाशित केली होती. खासदार संजय राऊत यांनी काल रात्रौ महाविकास आघाडीच्या बैठकीत हीच भूमिका घेऊन मुंबईच्या जागेच्या बदल्यात बल्लारपूर ची जागा सोडल्याची अधिकृत माहिती आहे.


मागील सहा महिन्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व सूचनेनुसार जिल्हा शिवसेनाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत होता. मात्र महाविकास आघाडीच्या झालेल्या अंतर्गत बैठकीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बल्लारपूर आम्ही काँग्रेसला सोडतो, मुंबईची एक अधिकची जागा आम्हाला द्या अशी वाटाघाटी केल्याने, मुंबईच्या जागेच्या बदल्यात बल्लारपूर ची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे.
उल्लेखनीय म्हणजे एक महिन्यापूर्वीच पब्लिक पंचनामा आपल्या वार्तापत्रात शिवसेनेला या भागात अधिक प्रतिसाद मिळत असला तरीही ही जागा शिवसेना लढणार नाही तर या जागेची बार्गनिंग पॉवर म्हणून ते वापर करतील आणि मुंबईची एक जागा अधिकची मिळवून घेतील याबाबत सुतोवाच केले होते. पब्लिक पंचनामाचे हे भाकीत शंभर टक्के खरे ठरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!