श्री क्षेत्र रामदेगी येथे सामूहिक श्राद्ध तर्पण व प्रवचन कार्यक्रम सम्पन्न

तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - चिमूर येथील श्री क्षेत्र रामदेगी येथे पितृपक्ष निमित्त चिंताहरण कपिश्वर देवस्थान तर्फे आयोजित मंगेश महाराज यांच्या मार्गदर्शनात सामूहिक श्राद्ध तर्पण व प्रवचन कार्यक्रम यशस्वीपणे सम्पन्न झाला.या कार्यक्रमात चंद्रपूर, नागपूर, उमरेड येथील भावीक भक्त व साधक उपस्थित होते.पन्नास जोडीने या सामूहिक श्राद्ध तर्पणात सहभाग घेतला.प्रवचनात शेकडोच्या संख्येत भाविक भक्त उपस्थित होते,तसेच मंगेश महाराज यांनी आपल्या प्रवचनात श्राद्ध तर्पण, पितृपक्ष यांचे महत्व सांगितले श्राद्ध का करावे,पित्रांना तृप्त कसे करावे कुठले उपायांनी पित्ररांना मुक्ती, सदगती,मोक्ष कसा मिळेल असे अनेक कथा रामायण,महाभारत, गरुड पुराण अश्या प्रमाणित ग्रंथातून शास्त्रशुद्धपणे आपल्या प्रवचनात सांगितले,पौरोहित्य व कार्यक्रमाचे संचालन,आभार प्रदर्शन पं.सतीश गुरुजी यांनी केले.तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भीष्मचार्य ह.भ.प.फलाहारी महाराज,व गणपत डाहे महाराज,ह.भ.प.शंकर कवळे महाराज व त्यांचा संच कार्यक्रम यशस्वी संस्थेचे विश्वस्थ  दशरथ ठावरी, विठ्ठल हनवते,प्रकाश कंगाले गुरुजी,हर्षद महाले,सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र वांढरे, दिनेश सोनुने, प्रदीप बदकी,बाळकृष्ण तामखाने, गोविंद महाले, गणेश भुजाडे,गोपाल महाले,प्रभाकर बारेकर,लोकेश, इत्यादीनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!