मांगरूळ येथे भव्य रक्तदान शिबिर.
मांगरूळ येथे भव्य रक्तदान शिबिर.
तळोधी (बा.):
युवकांमध्ये रक्तदानाबद्दल जागृती निर्माण होऊन रक्तदानाचे महत्त्व कळण्याकरता व आपल्या परिसरातील नागपूर, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, गडचिरोली सारख्या ठिकाणी आरोग्याच्या समस्या घेऊन गेलेल्या गरजू पेशंट ना शहरांमध्ये मोफत व वेळेवर रक्त उपलब्ध व्हावा व त्यांना रक्त गोळा करण्याकरिता अडचणी येऊ नये याकरिता 'स्वाब फाउंडेशन' सतत जंगलालगतच्या गावांमध्ये रक्तदान शिबिरे घेऊन रक्त संकलन करून गरजूंना मोफत वर्षभर रक्त पूरवीत असते. तसेच आरोग्य शिबिर आयोजित करून आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटपाचे कार्यक्रम करत असते.
याच अनुषंगाने आज नागभीड तालुक्यातील मांगरूळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकूण 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर हे आयोजन ग्रामपंचायत मंगरूळ नेचर केअर फाउंडेशन व वनरक्षक यांच्या संयुक्त पणे करण्यात आले याकरिता रक्त संकलन करण्याकरिता नागपूर येथील जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर ही रक्तपेढी आलेली होती. यांनी रक्त संकलन केले यावेळेस गावातील वेगवेगळे तरुण , परिसरातील गावातील ईतर काही युवकांनी व किटाळी येथील पोलीस पाटील किशोर कोलते, तर मांगरूळ जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री वानखेडे, वन रक्षक रवींद्र सिडाम, विद्युत विभागाचे कर्मचारी राजेश जकनवार यांनी सुद्धा रक्तदान केले .
या रक्तदान शिबिराच्या यशस्वीते करिता मांगरूळचे सरपंच यशवंत मेश्राम, वनरक्षक रवींद्र सिडाम, स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, पर्यावरण विभाग प्रमुख छत्रपती रामटेके, बचाव दल प्रमुख जिवेश सयाम, विनोद लेनगुरे, नितीन भेंडाळे, हितेश मुंगमोळे, गिरीधर निकुरे, शुभम निकेश्वर, अमीर करकाडे, भोलेनाथ सुरपाम अमन करकाडे यांनी परिश्रम घेत हा रक्तदान शिबिर आयोजित केला. यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्त दाण्यांचा प्रमाणपत्र, भेटवस्तू म्हणून स्टीलची पाणी पिण्याची बॉटल, नाश्ता केळी, देण्यात आल्या व या कार्यक्रमाचे आयोजनाबाबत जीवन ज्योती ब्लड बँक द्वारे सरपंच मंगरूळ यशवंत मेश्राम यांना व स्वाब संस्थेला स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या करिता जिल्हा परिषद शाळेचे शेड उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच महोदयांनी शाळेचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!