बल्लारपूर शिवसेनेकडे-संदीप गीर्हे उमेदवार?



बल्लारपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा सुटला असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांना नुकतीच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 29 ऑक्टोबर रोजी ते आपले नामांकन अर्ज दाखल करतील. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. तशा आशयाचे पोस्टर देखील समाज माध्यमावर फिरत आहेत.  संदीप गिरे यांनी एबी फॉर्म आणल्याची चर्चा असून, मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर येथे शिवसैनिक फटाके फोडत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच या मतदारसंघातून शिवसेनेने माघार घेतली होती त्यामुळे शिवसेनेने आपला प्रचारही थांबलेला होता. उमेदवारी नाकारल्याचे खुद्द उमेदवार गिरे यांनी कबूल केले होते मात्र काल मातोश्रीवरून गिरे यांना बोलवण्यात आले आणि आज त्यांचे उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असे सांगण्यात आले.
बल्लारपूर निर्वाचन क्षेत्रात भाजपाचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात शिवसेनेचे तरुण उमेदवार गिरे रिंगणात असणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!