बस व दुचाकीच्या धडकेत मुलगा ठार

चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरील घटना

जवळपास चार तास दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

जमावानी रस्त्यावर टायर जाळून केला घटनेचा निषेध

चार तासा नंतर दंगा नियंत्रक पथक घटनास्थळी दाखल

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेदाम )
 
वरोरा : - वरोरा तालुक्यातील पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत येत असलेल्या भेंडाळा पाटीवर आज दिनांक. २० ऑक्टोबर २०२४ ला सकाळी ०७:०० वाजताच्या सुमारास दुचाकी व एसटी महामंडळच्या बसने झालेल्या धडकेत १५ वर्षे दुचाकी चालक सृजल राजू साळवे हे जागेवरच मृत्यू झाला असून मागील चार तासापासून महामार्गावर तनावाचे वातावरण निर्माण झालेले होते.प्राप्त माहितीनुसार सृजल हा रविवार सुट्टी असल्यामुळे बजाज कंपनीची सिटी १०० दुचाकी क्र.एम.एच. ३४ बी. एस. ९४४६ गावातून शेतामध्ये जात असताना चिमूर कडून शेगाव कडे येत असलेल्या बसने जोरदार धडक  दिली असता चिमुर आगाराच्या बस क्र. एम. एच. ४० बी. एल. ३९८८ चिमूर चंद्रपूर सुपर बसणे जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकी चालक जागेवरच ठार झाला. हि धडक एवढी भीषण होती की सृजल हा धडक बसताच बसच्या काचेवर जाऊन आदळला. दुचाकी बसच्या समोरील चाकात येऊन १०० मीटर घासत गेली. ही घटना गावकऱ्यांना व  परिसरातील नागरिकांना माहिती होताच परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले.व जोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग बांधणारी कंपनी मृतकाच्या परिवाराला आर्थिक मोबदला देत नाही तसेच गावातून मुख्य महामार्गांवर येणारा रस्ता हा पूर्ण करून  देत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन राष्ट्रीय महामार्ग मागील ४ तासापासून स्थानिकांनी रोखून धरलेला होता.स्थानिक पोलीस स्टेशन शेगाव यांनी मध्यस्थी करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला पण जमाव आपल्या अटीवर कायम राहिले. शेवट २ तासानंतर चिमूर पोलीस उपनिरीक्षक राकेश जाधव हे घटनास्थळी पोहोचुन सुद्धा जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत मृतदेह उचणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे महामार्ग सुरळीत करण्यात आला नव्हता. रस्ता बांधकाम कंपनी व नागरिक यांच्यात बोलचाल सुरू असून मागील ४ तासापासून राष्ट्रीय महामार्ग हा ठप्प पडून दोन्ही बाजूला वाहणाच्या लाबंच लांब रांगा लागलेल्या आहेत.अखेर ४ तासा नंतर जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून दंगा नियंत्रण पथक चंद्रपूर यांना पाचरण करण्यात आले.हि घटना झाल्या नंतर घटना घडलेल्या एस.टी.बस चे चालक जवळील पोलिस स्टेशन येथे स्वतःहून जमा झाले.तर महामार्गावर टायर जाळून घटनेचा निषेध सुद्धा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!