जनतेच्या पाठिंब्यावर लोकप्रियतेचे शिखर !



जनतेच्या पाठिंब्यावर लोकप्रियतेचे शिखर !
काही मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, विजयी होतात, कार्यकाळ संपला की निवृत्त होतात. काहींचा कार्यकाळ लांबलचक असतोही. पण अफाट लोकप्रियतेचे भाग्य प्रत्येकाला लाभत नाही. महाराष्ट्रातील ज्या काही नेत्यांना जनतेच्या पाठिंब्यावर लोकप्रियतेचे शिखर गाठता आले आहे, त्यात वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आघाडीवर आहे. सरकारमध्ये असताना आणि नसतानाही त्यांच्याकडे सर्वसामान्य, गोरगरिब जनतेची गर्दी सारखीच असते. ‘अपयशाने लाजायचं नाही आणि यशाने माजायचं नाही’ या गुणामुळे त्यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांना ही लोकप्रियता लाभली. या सर्वच नेत्यांचा जनसंपर्क दांडगा होता. कार्यकर्त्यांना जपण्याचा त्यांचा मूळ स्वभाव होता. हाच आदर्श वसा सुधीर भाऊ मुनगंटीवार यशस्वीपणे सांभाळत आहेत.
दांडगा जनसंपर्क
सतत माणसांच्या गोतावळ्यात राहणाऱ्या, त्यांनाच आपले बलस्थान मानणाऱ्या सुधीरभाऊंचा जनसंपर्क दांडगा आहे. पहिल्या भेटीत समोरच्याला आपलेसे करण्याचा गुण त्यांच्या स्वभावात आहे. जनसेवेचे व्रत त्यांनी अंगीकारले आहे. आपण जनतेचे सेवक आहोत. जनतेने विश्वासाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ती कसोशीने पार पाडणे आपले कर्तव्य आहे, हीच त्यांची स्पष्ट भूमिका आहे.
नम्रता आणि सौजन्य यांचा सुंदर मिलाफ
सुधीरभाऊंच्या वागण्या बोलण्याची पध्दत समोरच्याला आपलेसे करून टाकते. नम्रता आणि सौजन्य यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या स्वभावात दिसून येतो. शांत आणि मृदू स्वभाव हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
इतरांचे मत जाणून घेण्याची वृत्ती
नेते मंडळी सहसा कुणाचे ऐकून घेत नाहीत. सुधीरभाऊंचे मात्र तसे नाही, ते समोरच्याचे बोलणे शांतपणे ऐकून आणि समजून घेतात. कुणी चांगली कल्पना दिली तर त्याचा स्वीकार करतात. त्यांनी घेतलेल्या अनेक मोठ्या निर्णयात त्यांनी वारंवार आवाहनही अनेकदा केले आहे. त्यांच्याकडून जे काही होण्यासारखे असेल ते अवश्य करतात. सर्व सामान्यांची अशी कितीतरी कामे सुधीर भाऊंनी स्वतः पाठपुरावा करून मार्गी लावली आहेत.
दिला शब्द केला पुर्ण
जनतेला दिलेल्या शब्दाला जागणे हा सुधीर भाऊंचा गुणविशेष आहे. त्यांनी एकदा शब्द दिला तर ते पूर्ण करतातच याची जनतेला खात्री पटली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात झालेला चौफेर विकास हे सुधीर भाऊंच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे यश आहे.
जनसेवेसाठी तत्पर
सुधीर भाऊंना कधीही फोन करा ते कुणालाही टाळत नाहीत. कधी संपर्क होऊ शकला नाही तर त्यांच्या कार्यालयाकडून तुम्हाला हमखास फोन येतो. सुधीर भाऊंसोबत संबंधितांचे बोलणे करून दिले जाते. समस्येचे स्वरूप बघून त्याचा पाठपुरावा केला जातो. संबंधीत विभागाकडे विचारणा करून प्रश्न सोडविले जातात. तुम्ही पाठविलेल्या पत्राचे उत्तर सुधीर भाऊंच्या कार्यालयाकडून हमखास येतेच. याच जिवाभावाच्या आत्मियतेतून त्यांनी असंख्य माणसे जोडली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!