चिमूर शहरातील नामांकित श्री बालाजी रेस्टॉरंट भोजनालय अँड लॉज च्या वेटर चे मृत्यू संशयास्पद
मोबाईलचा शोध फक्त देखावा तर नाही ना?
घातपाताचे प्रकार असावे अशी जनतेत चर्चा सत्र सुरु
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर शहरातील नामांकित श्री बालाजी रेस्टॉरंट भोजनालय अँड लॉज मधील कामगार अतुल आनंदराव कुंभरे वय २२ वर्षे राहणार खेडी तालुका सावली जिल्हा चंद्रपूर येथिल राहिवासी असून दिनांक.२७ सप्टेंबर पासून चिमूर शहरातील श्री बालाजी रेस्टॉरंट मध्ये मृतक वेटर म्हणून काम करीत होता. दिनांक. १९/१०/२०२४ ला रात्री ०१:३० वाजताच्या सुमारास हरविलेल्या मोबाईल च्या शोधात हॉटेल मधून बाहेर गेला असता तो हॉटेल मध्ये परत आलाच नाही. दुसऱ्या दिवशी दिनांक.२०/१०/२०२४ ला सकाळी ०९:३० वाजताच्या सुमारास अगदी श्री बालाजी रेस्टॉरंट ला लागूनच असलेल्या बालाजी सागर या तलावामध्ये मृतकाचे शव पाण्यावर तरंगतांना आढळून आले आहे. याबाबत ची माहिती हॉटेल मधील काम करणाऱ्या कामगारानेच बघितले असल्याची माहिती हॉटेल मालकाला देऊन हॉटेल मालकाने मोबाईल द्वारे ११२ या टोल फ्री असलेल्या पोलीस हेल्प लाईन नंबर वरती संपर्क साधून घटनेची माहिती दिली. व काही वेळातच सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोठे व पोलीस शिपाई पंडित बलदे यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा संपूर्ण पंचनामा करीत पुढील तपास सुरु केला असून प्रथमतः शव विच्छेदन करण्यासाठी शव उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेले असता शहरात सर्वत्र या घटनेची मोठ्या प्रमाणावर घातपात असल्याची चर्चा रंगली आहे.आज डिजिटल इंडिया च्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गवरील लावलेली CCTV कॅमेरे तपासली जावीत आणि तपासात सायबर च्या माध्यमातून लाईव्ह लोकेशनची तपासणी करून कॉल डिटेल रेकॉर्ड
( CDR ) तपासून हरविलेल्या मोबाईल चा शोध पोलीस घेणार का? अशा अनेक चर्चा सध्या ठिक - ठिकाणी जनतेत चर्चेच्या माध्यमातून बघायला मिळत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!