आम्ही विजयभाऊ वडेट्टीवारांसोबत - गावा गावात संवाद यात्रेतील सूर
सावली - तालुक्यातील बोथली पंचायत समिती क्षेत्रात महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात संवाद यात्रा काढण्यात आली. या यात्रेत गावागावात बैठकीस उत्सुपूर्द प्रतिसाद मिळाला व आम्ही विजयभाऊसोबत असल्याचा सूर निघत होता.
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाकडून उमेदवार म्हणून एकमेव दावेदार विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार हे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून गावागावात संपर्क सुरु आहे. बोथली पंचायत समिती क्षेत्रात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या युवक सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांचे नेतृत्वात संवाद यात्रा काढण्यात आली. यात्रेच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भागात केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सुरु आहे. पांढरसराड, भारपायली, मानकापूर, मानकापूर, सादागड, खेडी, चांदली बुज., केशरवाही, बोथली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते दिनेश चिटनूरवार, तालुका अध्यक्ष नितीन गोहणे, माजी सभापती विजय कोरेवार, महिला तालुका अध्यक्ष उषाताई भोयर, नगराध्यक्षा लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपवार, प्रीतम गेडाम, पल्लवी ताटकोंडावार, विजय मुत्यालवार, क्रिष्णा राऊत, रोशन बोरकर, गुणवंत सुरमवार, सुशील नरेड्डीवार, नरेश गड्डमवार श्रीकांत बहिरवार, अंजुताई बोरेवार, अशोक अलाम, महादेव कुमरे, युवराज वेटी, शरद मडावी, राजू कंचावार, विकास पुपरेड्डीवार, विलास येनगंटीवार, वामन भोपये आदी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!