समाज बांधवांकडून आदरणीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार

थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांची प्रेरणास्रोत स्मारके तसेच माळी समाज भवन व सौंदर्यीकरणाकरीता मूल येथील वॉर्ड क्रमांक 2 व 3 साठी 58.88 लक्ष रुपये विकास निधी मंजूर

प्रवीणभाऊ मोहुर्ले यांच्या पाठपुराव्याला मिळाले घवघवीत यश.


भारतीय जनता पार्टी सोबत जुडल्यापासून ते मूल नगरपरिषदचे उपाध्यक्ष व पक्षाचे कर्तबगार हरहुन्नरी कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपल्या जीवनातील बहुमूल्य असा वेळ जनतेच्या व समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी स्वतःला समाजासाठी समर्पित करणारे उत्तम वक्ते तसेच माळी समाजाचे युवा तडफदार नेतृत्व "मान.श्री. प्रवीण मोहुर्ले"

आज यांच्या अशाच कार्यशैलीच्या जोरावर मूल येथील वॉर्ड क्रमांक 2 व 3 मधील माळी समाज बांधवांच्या मागणीची दखल घेत आपली समाजासाठी नैतिक जबाबदारी समजून व समाजात जन्माला आल्यावर समाजाला आपल्या कडून काही देणं लागतं हा ध्यास मनी बाळगून नेहमी समाज हिताच्या दृष्टिकोनातून काम करावे अशी संकल्पना आपल्या मनामध्ये रुजवून आपल्या पाठपुराव्याच्या कलात्मक पद्धतीने
सन्मान.श्री. सुधीर मुनगंटीवार (वने व मत्स्य व्यवसाय मंत्री म.रा. तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा) यांच्या विकास आराखड्यातून 58.88 लक्ष रुपये निधी माळी समाज बांधवांसाठी मंजूर करून दाखवून दिलेला आहे..

अशाच अनेक बाबींमुळे व सतत समाजकार्य करण्याची त्यांची प्रभावशिल ऊर्जा यामुळे त्यांचे ध्येय धोरण स्पष्ट होते की त्यांची विचारसरणी ही समाजाला सोबत घेऊन चालण्याची आहे..

ठराविक मूल मध्येच नाही तर मूल तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा माळी समाजाला योग्य तो न्याय देण्यासाठी व त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कार्यरत असतात.समाजाप्रती त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय अप्रतिम व अभ्यासपूर्ण असून ते आपल्या कर्तुत्व गुणाच्या आधारावर समाजाला न्याय मिळवून देणारा व सामान्य माणसाच्या उपयोगी येणारा संपर्कात ठेवण्या जोगा नेतृत्व म्हणजे प्रवीणभाऊ.
सोबतच चित्तरंजन वाढई, मनीष कावळे यांच्यासह समजातील असंख्य कार्यकर्त्यांचे योगदान लाभले

एखादया पक्षात राहून काम करत असताना समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक कार्ये करणारे प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते
 दिवसा कंदील धरून फिरले तरी मिळत नाहीत 
म्हणून समाजातील प्रत्येक तळागाळातील व्यक्तींनी समाजातील अशा सामाजिक कार्यात अग्रेसर राहणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समाजाला आगळी वेगळी दिशा प्रदान करण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहावे ही नम्र विनंती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!