शेतातील जिवंत विद्युत तारेच्या करंट ने एका महिलेचा जागीच मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर तालुक्यातील मालेवाडा ते सावरगाव रोडवर जिवंत विद्युत तारेच्या करंट ने एका महिलेचा जागीच मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ०६:०० वाजताच्या सुमारास शेतात घडली. यामध्ये मृतक सुंदराबाई तुळशीराम चौधरी रा. सावरगाव वय ६५ वर्षे आहे.तर दुसरी महिला कमलाबाई मारोती नन्नावरे गाव सावरगाव वय ६० वर्षे या गंभीर जखमी झाल्या असून प्रथमोपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे हलविण्यात आले आहे.हे शेत शेतमालक श्रीहरी आत्राम यांनी वायद्याने ताराबाई घुग्गुसकर यांना दिले असून ताराबाई यांनी कचरा कापण्यासाठी दोन महिला रोजीने सांगितल्या होत्या परंतु डुकरांना मारण्यासाठी लावलेल्या करंट ने अशाप्रकारे घटना घडेल असे कुणाला माहित नव्हते अशा प्रकारची चर्चा जनतेमध्ये रंगली असून या घटनेने संपूर्ण सावरगाव मध्ये शोककळा पसरली असून घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमा झाली आहे.या घटनेचा पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!