'तो' 20 लाखाचा गुटखा कुणाचा?

 'तो' 20 लाखाचा गुटखा कुणाचा?


चंद्रपूर गुन्हे शाखेने दिनांक 19 आॅक्टोबर 2024 रोजी 38 लाख रूपये किमंतीचा सुगंधीत तंबाकूचा अख्खा ट्रक पकडल्यांने, अवैद्य गुटखा विक्रेत्यात खळबळ माजली आहे.  हा गुटका नेमका कुणाचा यावर आता तर्क वितर्क केले जात आहे.  पोलिसांनी दोन ट्रक चालकांवर कारवाई केली असली तरी, हे ट्रक चालक हा अवैद्य गुटखा कुणासाठी वाहतूक करीत होते, याचा तपास पो​लिस करतील काय? असा प्रश्न निर्माण निर्माण झाला आहे. मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार आणि परिसरातील चर्चेनुसार, मूळ आरोपीवर कारवाई करू नये यासाठी सावली पोलिसांवर प्रचंड दबाव आणण्यात आला.  त्यामुळे सावली पोलिसांनी ज्यांचे मालकीचा गुटखा आहे त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे बोलल्या जात आहे. केवळ वाहन चालकावर गुन्हा दाखल करून प्रकरण थंड बस्त्त्यात टाकीत असल्याचा आरोप होत आहे.

चंद्रपूर जिल्हयात निवडणूकीची आचारसंहितेचे पालन करण्याकरीता पोलिसांनी अवैद्य विक्रेत्यांवर नजर ठेवली.  गोपनीय माहीतीच्या आधारावर सावली पोलिस परिसरात पांढरे रंगाचे आयसर ट्रक मध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधीत तंबाकू पानमसाला विक्रीकरीता वाहतूक होत असल्यांचे माहीतीवरून स्थानिक गुन्हे शाखेने 19 लाख 93 हजार 800 रूपयाचा गुटखा पकडून वाहन चालक इरफान कुरेशी मुस्तफा, वय 27 वर्ष, राह. सुफेला, छत्तीसगड व संतोष कुमार सुंदर सिंह, वय 47, राह. पयली, छत्तीसगड यांचेवर गुन्हा दाखल करून अटक केली.

चंद्रपूर जिल्हयात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधीत सुंगधीत तंबाकूची विक्री जोरात सुरू आहे.  चंद्रपूर जिल्हयात अवैद्य गुटका विक्रीचे रॅकेट जयसुख ठक्कर आणि शेख झिमरी चालवित असल्यांची खुद्द पोलिसांची माहीती आहे.  छत्तीसगडवरून येत असलेला हा माल, या दोघांपैकीच कुणाचातरी असावा असा कयास लावला जात आहे.  वाहन चालकांची त्या दिशेने चौकशी केल्यास, नेमका माल कुणी मागविला, याच सुगावा मिळू शकतो.  मात्र पोलिस त्या दिशेने प्रयत्न करतील काय? असा प्रश्नही आता निर्माण होत आहे.

हा गुटखा नेमका कोणाचा होता हे पोलिसांना शोधणे सहज शक्य आहे. आरोपी असलेल्या ट्रक चालकांच्या मोबाईलचा CDR  काढल्यास, जिल्ह्यातला हा बडा अवैध धंद्यातला व्यापारी कोण हे शोधून त्याच्या मुसक्या आवळता येऊ शकते. मात्र या प्रकरणात पोलीस किती प्रामाणिक आहे यावरच पुढचा तपास शक्य आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधीत तंबाकूचा ट्रक पकडल्यानंतर, 'त्या' व्यापार्‍यावर कारवाई होवू नये यासाठी विविध मार्गातून 'दबाव' आणल्यांची चर्चा आहे.  याबाबत पोलिस अधिक्षक यांनाही कळविले होते. याबाबत पोलिस अधिक्षक यांनीही यावर माहीती घेतो असे आश्वासीत केले. मात्र रात्रौ प्रतिबंधीत गुटका विक्री करणारे मुळ मालकांवर कारवाई करण्याचे सोडून केवळ, वाहन चालकांवरच कारवाई केल्यांने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मूल शहरात उतरणार होता गुटखा

मिळालेल्या विश्वसनीय माहीतीनुसार, पोलिसांनी पकडलेला ट्रक मधील अर्धा 'माल' मूल शहरातील व्यापार्‍याकडे उतरविला जाणार होता.  अवैद्य गुटका विक्रीत गुंतलेला हा 'लखन' नामक व्यापारी याच ट्रकची वाट पहात गांधी चौकात थांबला होता, मात्र पोलिस कारवाईची माहीती मिळताच, तेथून त्यांनी काढता पाय घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!