वाघाच्या हमल्यात इसम ठार.
वाघाच्या हमल्यात इसम ठार.
यश कायरकर:
ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या शिंदेवाही वनपरिक्षेत्रातील व शिंदेवाही राऊंड मधील डोंगरगाव बीट, राखिव वन कक्ष क्रमांक 252 येथे गेलेल्या डोंगरगाव येथील विलास तुळशीराम मडावी (47) याला वाघाने ठार केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे की, धन कापनीचा सीजन असल्यामुळे धान कटाई केल्यानंतर धानाचेभारे बांधण्याकरता परिसरातील शेतमजूर हे जंगलामधून जाऊन सिंधी कापून गोळा करून भारे बांधण्याकरता आणत असतात. त्याकरिता आज डोंगरगाव येथील चार-पाच इसम जंगलामध्ये सिंधी आणायला गेले होते. गावालगत सिंधीचे झुडपे असताना सुद्धा कमी वेळात जास्तीत जास्त सिंधी मिळाव्या म्हणून घनंदाट जंगलात ज्या ठिकाणी वाघाचे वास्तव्य अशा ठिकाणी गेल्यानंतर परिसरात वावरणाऱ्या वाघाने हमला केल्यामुळेच ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस कर्मचारी तथा शिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्यासोबत संपूर्ण वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मोक्का पंचनामा करून मृतदेह विच्छेदनाकरिता शिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. व तात्काळ मदत म्हणून परिवाराला 25 हजार रुपयाची वन विभागामार्फत मदत करण्यात आली.
घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप लावून परिसरात गस्त वाढविण्यात आली असून अशा घटना घडू नये म्हणून परिसरातील लोकांनी काळजी घ्यावी असे वनविभागाने सुचविले आहे. तर परिसरातील लोकांनी तात्काळ त्या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
विशेष म्हणजे या परिसरात तेंदु पत्ता सीजनमध्ये याच परिसरामध्ये याच गावातील वेटे आडनावाचा इसम जंगलात तेंदुपत्ता तोडायला गेले असता वाघाने ठार केल्याची घटना घडलेली होती तेव्हापासून या परिसरातील जंगलात असलेल्या गावांना शिंदेवाही वनपरिक्षेत्रातील वन अधिकारी व वन विभागाद्वारे जंगलात प्रवेश न करण्याच्या वारंवार सूचना देन्यात येत असतात. सोबतच जंगलामध्ये वावरताना सावधानता बाळगण्याचे सुद्धा सूचना देत असतात मात्र परिसरातील लोक याकडे दुर्लक्ष करतात व घनदाट जंगलामध्ये प्रवेश करतात आणि अशा पद्धतीच्या घटनांना स्वतःच आमंत्रण देत असतात. त्यामुळे ह्या घटना टाळून न्यायचे असतील तर लोकांनी जंगलात वावरताना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. असे वन परिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर त्यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!