शेतात वीज पडून दोन व्यक्ती गंभीर जखमी.. ..


शेतात वीज पडून दोन व्यक्ती गंभीर जखमी.. ..

वरोरा.... जगदीश पेंदाम

तालुक्यातील शेगाव इथून जवळ असलेल्या शेगाव खुर्द या ठिकाणी दुपारच्या सुमारास शेतामध्ये वीज पडून दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडलेली आहे... 

सगळीकडे शेती हंगाम सुरू असून विजू उद्धव जांभळे यांच्या शेतामध्ये सोयाबीन कापणी सुरू  होती आज तीनच्या दरम्यान विजेच्या कडकड्यासहित वीज पडून शेतामध्ये विजू उद्धव जांभुळे शेतमालक वय 45 वर्ष तसेच शेतामध्ये सोयाबीन कापणी करता असणारी मजूर महिला मंजूषा प्रदीप शिरसागर वय 40 वर्ष दोघे जखमी झालेली आहे, दोनही शेगाव खुर्द येथील नागरिक आहे त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले आहे तसेच परिसरात झालेल्या परतीच्या पाऊसाने शेतामध्ये असलेल्या कपास पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी वर्गात सणासुदीच्या काळात चिंता वाढलेली आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!