शेगाव बु परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट

पर राज्यातील फिरस्ती चिल्लर विक्रेत्यांचे प्रमाण वाढले

पर राज्यातील किरकोळ फिरस्ती  व्यापाऱ्यामुळे शासनाचा जि.एस. टी. मोठ्या प्रमाणात चोरी होण्याची शक्यता

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव बु.पोलीस स्टेशन हद्दीत सध्या भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातलेला आहे. मागील काही महिन्यान पासून किरकोळ चोरीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्या मध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या मोटारी चे प्रमाण सगड्यात जास्त आहे. मागील काही दिवसा आधी शेगाव तसेच परिसरात कृषी पंम्प मोटार चोरी गेल्या तसेच खेमजई येथील शेतातील बंड्यामधून हळद उकळण्याचे तांब्याचे २ मोठे हांडे चोरीला गेले. परंतु अद्यापही या चोरट्याना पकडण्यात पोलीस विभागाला यश आले नसून दि. २८ ऑक्टोबरला राजू खीरटकर भेंडाळा यांचे अंगणातून वाळत घातलेले सोयाबीन रात्रीच्या सुमारास चोरी गेल्याने परिसरातील ऐन दिवाळीच्या सणांमध्ये शेतकऱ्यामध्ये भीती निर्माण झाली आहे.विशेष म्हणेज सध्या शेगाव परिसरात तसेच गावामध्ये परराज्यातील ताडपत्री, खुर्ची, पंखे,कापडं, साळ्या, मिक्सर, आदी अशा अनेक प्रकरच्या वस्तू विक्रेते यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच भंगार खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरील वाहने बिनधास्तपने फिरताना दिसून येतात. परराज्यातील या किरकोळ विक्रेत्यांकळे कुठलेही बिल नसल्या कारणाने शासनाचा मोठ्या प्रमाणात जि. एस. टी. चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच हे परराज्यातून येणारे विक्रेते स्थानिक पोलीस स्टेशन ला कुठलीही मुसाफिरी न भरता बिनधास्थपने गावात फिरत असल्या कारणाने व यांची नोंद कुठेही नसल्या कारणाने यतिलच तर काही ते भुरटे चोर नसेल ना अशा किती तरी शंका नागरिकांच्या मनात उत्पन्न होत आहे. त्यामुळे आता गावात फिरणाऱ्या या परप्रांतीयांची चोकशी करून नंतरच त्यांना गावात फिरण्याची परवानगी द्यावी व या भुरट्या चोरांनावर लवकरात लवकर लगाम लावण्यात यावे अशी मागणी गावातील तसेच परिसरातील नागरिकाकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!