विधानसभा निवडणूक: अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

विधानसभा निवडणूक आचारसंहिता अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची मुल येथे अवैद्य दारू वाहतुक विरुद्ध कारवाई


दिनांक 17/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. मुल हददीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, देवानंद बुरांडे रा.सुशी ता.मुल हा सुशी जानाळा मार्गे अवैध्यरित्या दारु वाहतुक करीत आहे, अशी खात्रीशीर माहीतीवरुन जाणाळा-सुशी मार्गावर नाकाबंदी करुन वाहन पकडले असता वाहनामध्ये देशी दारू रॉकेट संत्राच्या 10 पेटी एकूण 1000 नग 90ml मिळुन आल्या. दारूची किंमत 35,000/- ₹ व महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन 5,00,000/-₹ असा एकूण 5,35,000/-रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष कारवाई करून जप्त करण्यात आला.
आरोपी विरुध्द पो.स्टे.मुल येथे अपराध क्रमांक 388/2024 कलम 65 (अ ) म.दा.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यवाही पथकात पोनि महेश कोंडावर, पोउपनि मधुकर सामलवार, पो हवा. नितीन साळवे, सुभाष गोहोकार, पोशि मिलींद जांभुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचा समावेश आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!