शमी डोर्लीकर यांच्यावर धारदार शस्त्राने वार
शमी डोर्लीकर यांच्यावर धारदार शस्त्राने वार.
चार ते सहा व्यक्तींनी मिळून वार केल्याची माहिती आहे.
शमी डोरलीकर यांचे डोक्यावर मार असल्याचे माहिती आहे.
मुल येथील प्रतिष्ठित नागरिक शम्मी डोरलीकर यांच्यावर आज धारदार शस्त्राने वार केल्याची खळबळजनक घटना घडली असून शम्मी डोलकर यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मूल भरती करण्यात आले. तेथून प्राथमिक उपचार करून त्यांना चंद्रपूरला हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे. ही घटना महिला सभागृहाचे बाजूला घडल्याची माहिती आहे. अंधाराचा फायदा घेत हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मारहाण करणारे राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची प्राथमिक माहिती आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!