10 लाखाची खंडणी न दिल्यांनेच बदनामी — जीवन कोंतमवार यांचा आरोप

 10 लाखाची खंडणी न दिल्यांनेच बदनामी — जीवन कोंतमवार यांचा आरोप



मूल (प्रतिनिधी)

आपण आपला व्यवसाय स्वच्छपणे करीत आहोत, आपला सर्वच व्यवहार एक नंबरचा असून, केवळ 10 लाखाची खंडणी न दिल्यानेच मूल येथील पत्रकार अशरफभाई यांनी आपली बदनामी मोहीम चालविली असून, आपल्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी अशरफभाई यांचे विरोधात खंडणी मागीतल्याचा गुन्हा दाखल केल्याची माहीती मूल शहरातील राईस मील व्यावसायीक जीवन कोंतमवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.  राईस मील असोसिएशनच्या सभागृहात आयोजीत पत्रकार परिषदेत जीवन कोंतमवार यांनी त्यांचे विरोधातील बातम्यांचे खंडण केले आणि अशरफभाई मिस्त्री यांचे विरोधात आपण मानहानीचा दावा करणार असून, तडीपारची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.

ज्या जमिनीच्या संदर्भातील बातमी देवून आपली बदनामी केली, त्यात कोणतेही तथ्य नाही,  जमिनीतून तार काढणे, पांदण रस्त्याचे कामे, येलो बेल्ट करणे ही कामे आपण जमिनी खरेदी करण्यापूर्वीच करण्यात आल्याची माहीती त्यांनी दिली.  श्री. राजेश्वर सुरावार हे आपले नातेवाईक असल्यांने या जमिनीपैकी काही भाग त्यांना विकण्यात आल्यांचे सांगून या प्रकरणाशी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा संबध नसल्यांचे त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.

आपण मागील तीन वर्षापासून शासकीय धान भरडायी करीत आहोत, मात्र या तीनही वर्षाचे धान भरडाईचे शासनाने एकही रूपया दिला नाही, अशा परिस्थितीत शासकीय धान भरडायीच्या कामात 33 करोड रूपये आपण बोगस बिलाचे माध्यमातून घेतल्यांचा आरोप खोटा असल्यांचे त्यांनी सांगीतले.

अशरफभाई मिस्त्री यांचेकडे आपण गेलो असल्यांचे कोंतमवार यांनी कबुल केले. जाहीरात मागतील अशी आपली अपेक्षा होती मात्र त्यांनी 10 लाखाची खंडणी मागीतल्यांने आपण परत आलो आणि पोलिसात तक्रार दिली अशी माहीती त्यांनी दिली.  आपले व्यावसायीक भागीदार हिरेन शहा, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी श्री. अशरफभाई यांचेसोबत या बातमीचे संदर्भात बोलले असल्यांचे त्यांनी सांगीतले.

या संदर्भात मूल पोलिसांनी अशरफभाई यांचे विरोधात गुन्हे दाखल केले आहे.

खंडणीचे आरोप खोटे — अशरफभाई

या संदर्भात, अशरफभाई मिस्त्री यांनी, जीवन कोंतमवार यांनी केलेले 10 लाख रूपये खंडणीचे आरोप फेटाळून लावले. आपण बातमी प्रकाशीत केल्यानंतर, जीवन कोंतमवार यांनी आपलेशी संपर्क साधला होता.  खंडणी बातमी प्रकाशीत करण्यापूर्वी मागीतली जाते, आपण खंडणीसाठी काम केले असते तर, बातमीच कशाला प्रकाशीत केली असती? असा सवाल त्यांनी केला.  या संदर्भात त्यांनी पोलिसांनी काढलेल्या प्रेस नोटवरही प्रश्न उपस्थित करून, ही प्रेस नोट खरीच आहे काय? असा प्रश्न केला. आपण गुटका, अवैद्य दारू विक्रेते, सट्टाबाजाचे विरोधात आघाडी उघडल्यांने हे सर्व आपले विरोधात एकत्र येत षडयंत्र करीत असल्यांचे अशरफभाई मिस्त्री यांनी सांगीतले.

उल्लेखनीय म्हणजे, श्री. अशरफभाई मिस्त्री हे आपल्या घरीच, नेहमीच्या बैठकीत बसून आपले दैनदिन काम करीत असतांनाही पोलिसांनी त्यांना 'फरार' दाखवून तशी प्रेस नोट माध्यमांना पाठविली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!