वाघाच्या हल्यात मेंढपाळ गंभीर जखमी - सावली वनपरीक्षेत्रातील एमआयडीसी परिसरातील घटना
सावली - सावली वनपरीक्षेत्रात मेंढ्या चारत असतांना वाघू नागाजी कंकलवार या मेंढपाळावर वाघाने हल्ला केल्याने मेंढपाळ गंभीर जखमी झाला असून गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
तालुक्यातील चांदली बुज. येथील मेंढपाळ वाघू कंकलवार हे मुल तालुक्यातील एमआयडीसी परिसरात मेंढ्या चारत असतांना दुपारच्या सुमारास वाघाने हल्ला केला. सोबत्याने आरडाओरड केल्याने वाघाने पळ काढला. मात्र मेंढपाळ गंभीर जखमी झाल्याने सावली ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गडचिरोली जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!