टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्मिती कार्यक्रम संपन्न...
वरोरा... जगदीश पेंदाम
आनंद निकेतन महाविद्यालयल, वरोरा येथे तीन महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन.सी.सी नागपूर युनिटच्या कॅडेट्स यांनी 'स्वच्छता ही सेवा' या उपक्रमा मध्ये सहभाग घेऊन कचरा नियोजन व स्वच्छतेची जनजागृती करण्याकरीता आपल्या घरातील टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ अशा आकर्षक गृहसजावटीच्या वस्तूंची निर्मिती करीत या उपक्रमात सहभाग घेतला. यातूनच लोकांना कचऱ्याचे पुनर्वापर करण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमा प्रसंगी आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. मृणाल काळे सर यांनी सर्व सहभागी कॅडेट्सचे कौतुक तथा अभिनंदन,तसेच मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या संयोजिका ANO लेफ्टनंट लता आत्राम,यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आनंदात संपन्न झाला...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!