मुनगंटीवारांच्या पहिल्या निवडणूकीचा किस्सा!
मुनगंटीवारांच्या पहिल्या निवडणूकीचा किस्सा!
राज्यातील भाजपाचे दबंग नेते, मुख्यमंत्री पदासाठी 'चर्चीले' जाणारे, आणि विदर्भातील डब्बल हॅट्रिक करून विधानसभेत आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करणारे एकमेव नेते म्हणून सुधीर मुनगंटीवार परिचित आहे. आपल्या वेगळ्या कार्यशैलीने आपला 'प्रभाव' अजूनही कायम ठेवले आहे. सहावेळा विधानसभेच्या निवडणूकीत विजयी होणारे मुनगंटीवार यांची पहिली निवडणूक कशी झाली? याचा मजेदार किस्सा त्यानीच प्रेस क्लब मूलच्या मीट द प्रेस कार्यक्रमात सांगीतला.
त्याचे झाले असे, विद्यार्थी दशेत, ते बि.कॉम.ला सरदार पटेल महाविद्यालयात शिकत असतांना, त्यांना त्यांच्या मित्र परिवारांकडून वर्गनायक पदासाठी निवडणूकीत उभे रहावे असा आग्रह झाला. सुधीर मुनगंटीवार यांनी नाही—नाही म्हणत होकार दिला. वर्गातून ते अविरोध येणार हे जवळपास नक्की होते. मात्र मुनगंटीवार ठरले जनसंघ विचारसरणीच्या घराण्यातील. त्यामुळे, कॉंग्रेस पक्षाशी संबधीत एका विद्यार्थाने मुनगंटीवार यांचेकडे येवून कैफीयत मांडली, 'तु, अविरोध यावसं असं मलाही वाटते, मात्र माझे घरचे लोक कॉंग्रेस पक्षाशी संबधीत आहेत, त्यांचेवर तुझे विरोधात मला निवडणूक लढविण्यासाठी प्रचंड दबाव आहे, निवडूण तर तुच येणार आहेस, मला कुणीही सुचक—अनुमोदक मिळत नाही, तुच मला दोन विद्यार्थी सुचक—अनुमोदक म्हणून दे' सुधीर मुनगंटीवार यांनी, आपल्या जवळच्या दोन मित्राना, आपले विरोधी उमेदवारांचे सुचक—अनुमोदक होण्यास सांगीतले. निवडणूकीची धामधुम सुरू झाली. विरोधी गटाचे विद्यार्थानी प्रचार करणे सुरू केले, 'सगळे सुधीर मुनगंटीवार यांनाच मते देणार आहेत, मला फक्त माझे एकच मत पडले तर बरोबर वाटणार नाही, त्यामुळे तुझे एकतरी मत दे, म्हणजे माझी इज्जत तरी वाचेल' विरोधक उमेदवारांचा हा डाव यशस्वी व्हायला लागला. आपण गप्प राहीलो तर, पराभूत होवू हे लक्षात येताच, सुधीर मुनगंटीवार यांनी, मिलन चौकातील मिलन हॉटेलमध्ये आपल्या सहकारी मित्रांची बैठक घेवून प्रचार करण्यांचा निर्णय घेतला. निवडणूक झाली आणि विरोधी उमेदवारांना केवळ तीन मते मिळाली. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या आयुष्याची पहिलीच निवडणूक एकतर्फी जिंकली! पुढे छात्र संघाचे अध्यक्ष पदाची निवडणूकही एकतर्फी जिंकली आणि आता तर ते राज्याच्या राजकारणातील बडे खिलाडी बनले आहे.
चंद्रपूर
Chandrapur



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!