मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा नेहरु विद्यालय, शेगाव बुज तालुक्यात प्रथम

     
तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाद्वारा भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २  हे अभियान सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरीता राबविण्यात आले. या अभियानात तालुक्यातील अग्रस्थानी चिमुर एज्युकेशन सोसा. चिमूर द्वारा संचालीत नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव बूज या शाळेला तालुक्यातुन प्रथम क्रमांकचा बहुमान मिळेला.राज्य शासनाने माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानामध्ये तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांकरीता रोख स्वरूपात पारितोषिक देण्याची घोषना शासनाने केली. या अभियानात खाजगी व्यवस्थापन व जिल्हा परिषद शाळांनी सहभाग घेतला. वरोरा पं. समिती अंतर्गत खाजगी व्यवस्थापन शाळांमधुन नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव बुज या शाळेला तालुक्यातुन प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यामुळे तीन लाख रु देऊन गौरवण्यात येणार आहे. या उपक्रमात हि शाळा १५० पैकी १२७ गुण प्राप्त तालुक्यातुन अव्वल राहिली. शाळेच्या या यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर चहारे, केंद्र प्रमुख सागर पाटील, चिमुर एज्युकेशन सोसा. चिमूरचे सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेर खाॅ पठान, शाळेचे मुख्याध्यापक ढाकुणकर सर, नरेन्द्र कन्नाके, महेश निखारे, तसेच शंभरकर, चांगले, वरभे, हिवरकर, तथा सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!