नेहरू कनिष्ठ महाविद्यालय चिमूर येथे राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय युवा संगठन कार्यक्रम संपन्न
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - नेहरू कनिष्ठ महाविद्यालय चिमूर येथे राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय युवा संगठन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29/09/2024 रोजी रविवार ला एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. "आवाज दो हम एक है" या अभियानाला केंद्रित करून राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व राष्ट्रीय युवा संगठन च्या साथींच्या सहकार्यां ने एक दिवसीय शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. निशिकांत मेहरकुरे सर होते तर प्रमुख पाहुणे व अतिथी म्हणून राष्ट्रीय युवासंगठन महाराष्ट्र राज्य चे माजी संयोजक श्री. मनोज दादा ठाकरे, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान चे कार्यकर्ते राष्ट्रीय युवा संगठनचे वरिष्ठ साथी या प्रशांतदादा नागोसे वर्धा, श्री विनोद दादा देवतळे यवतमाळ, राष्ट्रीय युवा संगठन महाराष्ट्र राज्य चे संयोजक श्री ज्ञानेश्वर सोनुने औरंगाबाद व अजय नरड, श्री विशाल धोटे, श्री किशोर चौधरी, करण, शंकर, जगदीश, अजय, सानिका, वैशाली, मनिषा व चंद्रपूर जिल्हा राष्ट्रीय युवा संगठन संयोजक प्रा अर्चना हटवार उपस्थित होते. एक दिवसीय कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिराची सुरवात सकाळी 08.30 वाजता शिबिरार्थी नोंदनी व गटविभागणी ने झाली. सकाळी 9.00 वाजता शिबिराचे उद्घाटन प्राचार्य मेहरकुरे सर यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी बुंद बुंद लहर - लहर हे स्वागत गित नृत्य व गित गा रहे है हम हे समुह गीत सादर केले. शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन राष्ट्रीय युवा संगठनाच्या सर्व वरिष्ठानी केले तर दुपारच्या लंच ब्रेक नंतर विद्यार्थ्यांना विविध खेळांचे मार्गदर्शन करून त्यांच्याकडून ते खेळ खेळवून घेतले. दुपारच्या दुसऱ्या सत्रात " आवाज दो हम एक है" ह्या अभियाना वर श्री मनोज ठाकरे, विनोद देवतळे प्रशांत नागोसे या मार्गदर्शकांनी विचार मंथन केले. राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय युवा संगठन याविषयी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. " हिंदुस्थान तुम्हारा है आवाज दो हम एक है" या राष्ट्रीय एकात्मता गीताने विद्यार्थ्यांन मध्ये चैत्यन्य निर्माण केले. प्राचार्य मेहरकुरे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात देशाची परिस्थिती व युवकांनी पुढे येवून काय करावे यावर प्रकाश टाकला. समाजाला देव परमेश्वर यान पासून भीती नसून त्याची उपासना करण्याऱ्यापासून भीती वाटते असे परखड विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता सर्वधर्म प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा भालचंद्र लोडे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन रा. से. योजना स्वयंसेविका कु. गौरकर हिने केले.व संयोजक ज्ञानेश्वर सोनुने व प्रा.अर्चना हटवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!