नेहरू कनिष्ठ महाविद्यालय चिमूर येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा

स्वच्छता हिच सेवा अभियानचे आयोजन

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.२४ /०९/२०२४ रोजी मंगळवार ला नेहरू कनिष्ठ महाविद्यालय चिमूर येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन व स्वच्छता हिच सेवा अभियानाचे आयोजन २४ सप्टेंबर २०२४ रोज मंगळवार ला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा दिन व स्वच्छता हिच सेवा अभिमान अंतर्गत स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता संकल्पनेवर कार्यकमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्राचार्य मेहरकुरे सर अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवा निवृत्त प्राध्यापक चरडे सर तर विशेष अतिथी म्हणून सावरकर सर यांनी राष्ट्रसंताचे कार्य आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य हे एकमेकांना पुरक आहेत असे प्रतिपादन केले. प्रा.चरडे सर यांनी राष्ट्रभक्तीने प्रेरक असा विद्यार्थी घडला पाहिजे तोच उद्या चा जबाबदार नागरिक म्हणून देशाची प्रगती करेल असे रसाळ भाषेत विद्यार्थ्यांची मने जिंकली. व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाचे अधिकारी प्रा.भालचंद्र लोडे सर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व पटवून दिले. प्रा.गोमासे यांनी स्वच्छता हिच सेवा अभिमान अंतर्गत स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता यावर आपले विचार मांडले. प्रा.वाघधरे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुणे परिचय करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्दिष्टा वर प्रकाश टाकली. प्राचार्य मेहरकुरे सर यांनी विद्यार्थी हा शाळेचा व समाजाचा केंद बिंदू असून तो आपल्या योग्य संस्कारक्षम शिक्षणातून समाजाला उन्नत करू शकतो यावर आपले मौलिक विचार व्यक्त केले . कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या पुजनाने झाली. तर राष्ट्रीय सेवा योजनेचे लक्ष गीत रा.से.यो. स्वयंसेविकांनी गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.खुशबू गौरकर तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.कल्याणी सातपुते हिने केले तर साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अरपावे हे मत सर्वांसमोर व्यक्त करुन एकोपा आणि प्रेमाची भूमिका मांडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!