चकपीरंजी येथे अँपल बोर व आंबा कलमीकरण प्रशिक्षण - देवसाळी शेतकरी उत्पादन कंपनीचा पुढाकार

 

सावली - देवसाळी शेतकरी उत्पादक कंपनी व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने तालुक्यातील चकपीरंजी येथे गावरान बोर व आंबा रोपांवर सुधारित अँपल बोर व आंब्याचे कलमीकरण करण्याचे व फळबाग लागवड बाबत तांत्रिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रशिक्षण शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक अनिल स्वामी यांचे शेतावर घेण्यात आले. यावेळी परीसरातील शेतकरी, कृषि कर्मचारी व तरुणांनी सहभाग घेतला.  या प्रशिक्षणात बोरिवरील रिंग बडींग, पॅच बडींग व आंबा पिकावरील पाचर कलम बाबत सावली चे मंडळ कृषि अधिकारी दिनेश पानसे यांनी तांत्रिक माहीती देऊन प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच मग्रारोहयो अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना फळबाग व बांबू लागवडीबाबत प्रशिक्षणात तांत्रिक माहीती देण्यात आली. 

       याप्रसंगी अनिल स्वामी यांनी शेतकऱ्यांना स्वतःचे आंबा फळबागेचे अनुभव विषद करून फलोत्पादक पिके लागवडीतून विकास साधण्याचे व तरुणांनी कलमीकरणाचे कौशल्य अवगत करून रोजगार करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणास कृषि पर्यवेक्षक सचिन जाधव, कृषि सहाय्यक प्रदीप जोंधळे, पवन ठाकरे, योगेश टेकाडे, लक्ष्मी ढोंगे, अक्षय ठीकरे तसेच परिसरातील शेतकरी व तरुण यांनी उपस्थित राहून प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!