धान पिकावर रोग, किडीचा प्रादुर्भाव. अनुदानावर औषध पुरविण्याची मागणी.
धान पिकावर रोग, किडीचा प्रादुर्भाव.
मुल(प्रती)
सध्या धानपिक वाढीच्या अवस्थेत आहे. वातावरण उष्ण, दमट असल्याने धान पिकावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. किडीच्या नियंत्रणासाठी अनुदानावर शेतकऱ्यांना औषधी पुरविण्यात यावी अशी मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.
मुल तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतल्या जाते. तालुक्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामात धान पिकाची लागवड करून आपली उपजीविका करतात. खरीप हंगामात तालुक्यातील धानपिक पीक हे महत्वाचे पिक आहे. येथील उत्पादित धान पिकाला मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत मागणी आहे.
सध्या वातावरण उष्ण, दमट असल्याने धान पिकावर मोठ्या प्रमाणात रोग, किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. कीटकनाशके महागडे असल्याने शेतकऱ्यांना घेणे परवडत नाही. शासनाकडून अनुदानावर कृषी विभाग अंतर्गत रासायनिक कीटकनाशके किडीच्या नियंत्रणासाठी देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!