न्यू झंकार मस्कऱ्या गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबिर संपन्न
तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगांव बु येथे न्यू झंकार मस्कऱ्या गणेश मंडल नेहरू वार्ड मंडळातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. भव्य रक्तदान शिबिर हे 25 सप्टेंबर बुधवार ला सकाळी घेण्यात आले.यावेळी रक्त संकलन शासकीय ब्लड बँक जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांना आयोजित करण्यात आले होते.रक्तदान शिबिरात गणेश मंडळातील कार्यकर्ते तसेच गावातील इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून 25 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले, रक्त संकलन वेळी वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक चंद्रपूर गणेश तुपेकर, टेक्निशियन अमोल जिदेवार, प्रयोगशाळा सहाय्यक प्रतीक मोठे तसेच आदी कर्मचारी होते.यावेळी कार्यक्रमात सर्व रक्तदात्याना मंडळाकडून चाय व अल्पोउपहाराची व्यवस्था करण्यात आली, मस्कऱ्या गणेश मंडळांनी असेच सामाजिक अभिनव उपक्रम कार्यक्रम राबवावे अशी अपेक्षा गावातील नागरिकाकडुन करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!