चिमूर शहरात मुस्लिम एकता कमिटी तर्फे निषेध मोर्चा
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक. ०९ सप्टेंबर २०२४ सोमवार ला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात मुस्लिम एकता कमिटी तर्फे भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.अहमदनगर येथील सभेमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात तुम लोगोंने कुछ भी मस्ती कि तो तुम्हारे मस्जिदो के अंदर आकर चुन - चुन के मारेंगे इतना ध्यान में रखो अशा भडकाऊ शब्दरचनेची जनतेसमोर मांडणी करुन जाणून बुजून आणि हेतूपूरस्पर जातीय तेढ निर्माण करुन देशाची एकात्मता खंडित करून दंगल घडविण्याचा प्रयत्न करणे आणि दोन धर्मांमध्ये द्वेष पसरविण्याचे काम केल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना त्वरीत अटक करावी.याकरिता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चा मध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम समुदाय नेहरू विद्यालय येथे एकत्रित येऊन दुपारी वेळ ०२:०० वाजता या मोर्चाची सुरुवात केली जाणार आहे. तर हा मोर्चा नेहरू विद्यालय पासून तहसील कार्यालय तसेच पोलीस स्टेशन ला मार्गस्त होऊन या मोर्चाची निवेदन देऊन सांगता करण्यात येणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!