बारव्हा गावात पौष्टिक तृणधान्य प्रोत्साहन अभियानाच्या अंतर्गत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम ....

बारव्हा गावात पौष्टिक तृणधान्य प्रोत्साहन अभियानाच्या अंतर्गत उद्योजकता विकास प्रशिक्षण  कार्यक्रम ....
 
  वरोरा.. जगदीश पेंदाम

 पौष्टिक तृणधान्य प्रोत्साहन अभियानाच्या अंतर्गत विचार विकास सामाजिक संस्था, वरोरा व अ फॉर्म पुणे च्या संयुक्त विद्यमाने बारवा गावामध्ये दोन दिवशीय उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला बारवा, आर्वी, शिंदोला गावातील बचत गटातील महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विचार विकास सामाजिक संस्था वरोरा चे कार्यकर्ते व कोरो महिला समाज संपत्ती अधिकार विषयावर काम करणाऱ्या सोनाली मोरेश्वर व्यापारी यांनी केली. उद्योजकता विकास, व मिनिट्स चे महत्व, मिलेट पदार्थाचा व्यवसाय या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी  हरीश भगत सर यशदा प्रशिक्षक पुणे, कृषी पर्यवेक्षक वरोरा  लोखंडे सर,  विणा पिसे मॅडम यांनी महिलांना मार्गदर्शन केले. ज्वारी ,बाजरी ,नाचणी, भगर, राजगिरा यापासून पदार्थ बनवून दाखविलीत. महिलांचा कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रमाला विचार विकास सामाजिक संस्था वरोरा ची टीम कुणाल सुलभेवार, ममता बेलगंधवार, वैशाली नगरकर, सुषमा चाफाले उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!