सोमवारी वार्ड पवनी येथे तान्ह्या पोळा मोठ्या उत्साहात संपन्न

बालगोपालांनी विविध रंगभूषा व वेशभूषा करून सजविले नंदीबैल

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.०३/०९/२०२४ तान्हा पोळा हा विदर्भाची खास ओळख आहे.लहान मुलांना बैलाचे व शेतीचे महत्व समजावे म्हणून १७८९ मध्ये श्रीमंत राजे भोसले यांनी सुरू केलेल्या या उत्सवाला तब्बल २३५ वर्षे पूर्ण होत आहे.संपूर्ण विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.या दिवशी लहान मुले लाकडी नंदीबैल सजवून पोळा साजरा करतात.विदर्भ वगळता भारतात कुठेच हा सण साजरा केला जात नाही.श्रीमंत राजे भोसले यांनी लहान मुलांना बैलाच्या श्रमाचे महत्त्व कळावे यासाठी तान्ह्या पोळ्याची सुरुवात केली.याच धर्तीवर सोमवारी वार्ड पवनी येथे माजी न.प. सदस्य राकेश बिसने,सुधीर भोगे आणि मोरेश्वर भोगे यांनी तान्ह्या पोळ्याची सुरुवात केली.दिनांक.३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वा. न.प.सक्सेना प्राथमिक शाळेच्या भव्य प्रांगणात तान्ह्या पोळ्याचे आयोजन करण्यात आले.सर्वप्रथम शहरातील मुख्य मार्गाने जमलेल्या बालगोपाल यांच्या नंदी बैलाची पुजा करुन मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर‌ शाळेच्या भव्य प्रांगणात तान्हा पोळा भरवविण्यात आला.व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेश बिसने,प्रमुख उपस्थिती सुधीर भोगे,राकेश बिसने पारस बिसने,तर परीक्षक म्हणून राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी,मुख्याध्यापक देवानंद हरडे, देशोन्नतीचे पत्रकार ब्रम्हदास बागडे,लोकमतचे पत्रकार हरिश्चंद्र भाजीपाले,पत्रकार बबलू पिसे, प्रकल्प अधिकारी सरिता शेंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मंचावरील उपस्थित मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.बालगोपाल यांनी सजविलेल्या नंदीबैल स्पर्धेचे परीक्षक यांनी निरिक्षण करुन निकाल जाहीर केला.यामध्ये प्रथम क्रमांक शिवांश लिमजे, द्वितीय अक्षता बिसने, तृतीय ज्ञान प्रशांत सावरबांधे यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व ट्राॅफी देऊन सन्मानित करण्यात आले. उर्वरित नऊ स्पर्धकांना प्रोत्साहन पर रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार राकेश बिसने यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजक प्रणय धुरई, शिवम बिसने,निमेश कोल्हे, अनिकेत बिसने,दिनेश भोगे,परीतोष भोगे, आशिष रायपुरकर, ओंकार रायपुरकर, आशिष फुलबांधे,सेमिल भोगे,अंकुश धुरई यांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी शहरातील नागरिक,बाल मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!