रावत कि मुलचंदानी? उमेदवारीवरून मुंबईत हलचली!

रावत कि मुलचंदानी? उमेदवारीवरून मुंबईत हलचली!



बल्हारपूर ​विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार? घनश्याम मुलचंदानी कि, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत? यावर सध्या पक्षश्रेष्ठीचे मंथन सुरू असल्यांची राजकीय बातमी आहे.  भाजपाचे दिग्गज उमेदवार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मागील लोकसभा निवडणूकीत त्यांचेच मतदार संघातून कॉंग्रेस उमेदवाराला मोठी आघाडी मिळाल्यांने, कॉंग्रेसचा विजय निश्चिंत मानला जात असला तरी, 2019 च्या निवडणूकीतही असाच परिस्थिती मुनगंटीवार यांनी सहा महिण्यांत बदलवून भाजपचा गड कायम राखला होता.  या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसकडून आता कोणतीही रिस्क घेणार नसल्याची चर्चा असून, 'योग्य' उमेदवार देण्यासाठी विचार मंथन केला जात आहे. बल्हारपूरचे घनश्याम मुलचंदानी आणि मूलचे संतोष रावत यांचे नावांवर पक्ष गांभीर्याने विचार करीत असल्यांचे सुत्रानी सांगीतले.

कॉंग्रेसचे बल्हारपूरचे नेते, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनी यावेळी बल्हारपूर मतदार संघातून दावेदारी केली आहे.  काही दिवसापूर्वीच ते मूल येथे येवून, अनेकांची भेट घेत चाचपणी केली.  त्यावेळी त्यांना त्यांचे समर्थकांकडून 'अभी कॉंग्रेसके अच्छे दिन है, अच्छा मोका है, छोडना मत' असा सल्ला दिला. 

 यापूर्वी ते 2014 मध्ये मुनगंटीवार यांचे विरोधात निवडणूक लढविली होती.  त्यावेळी मोदी लाट आणि सुधीर मुनगंटीवार यांचा जबरदस्त पगडा असतांनाही मुलचंदानी यांनी 60118 मते घेतली होती. मतदारांची संख्या वाढल्यानंतरही ही मते 2019 मधील कॉंग्रेस उमेदवार विश्वास झाडे (52762) यांचेपेक्षा अधिक होती.  यामुळे मुलचंदानी यांची उमेदवारी दखलपात्र समजली जात आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनीही बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रातून दावा केला आहे.  संतोष रावत यांनी वाड्यातून फारकत घेतल्यानंतरच्या प्रत्येक निवडणूकीत उमेदवारी मागीतली, मात्र त्यांना नेहमीच डावलण्यात आले.  2004 च्या निवडणूकीत श्री. रावत यांनी कॉंग्रेसकडे आग्रहाने उमदेवारी मागीतली.  दिल्ली वारीही केली, मात्र त्यावेळी कॉंग्रेसने माजी आमदार देवराव भांडेकर यांचेवर विश्वास ठेवला.  या निवडणूकीत भांडेकर यांचा​ निसटता पराभव झाला.  यानंतरही रावत यांनी दावेदारी कायम ठेवली, मात्र त्यांचेऐवजी कॉंग्रेसने दुसर्यावरच विश्वास टाकला.  यावेळी मात्र संतोष रावत यांनी उमेदवारीसाठी कंबर कसली असून, प्रचाराला गावोगावी सुरूवात केली आहे आणि त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे.  संतोष रावत समर्थक कार्यकर्ते गावा—गावात जावून रावत यांनाच निवडूण आणण्याचे आवाहन  हे कार्यकर्ते करीत आहेत.  मूल, पोंभूर्णा तालुक्यातील ग्राम पंचायत पदाधिकारी, पक्ष संघटना, सहकार संस्थातील पदाधिकारी हे रावत यांचे बाजूने असल्यांने सध्यातरी, त्यांची उमेदवारी दखलपात्र होत आहे. रावत हे मूल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, चंद्रपूर​ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आहेत. राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जाते. मूल तालुक्यातील 'ओबीसी' समाजाचे आंदोलनात अग्रणी असलेले जवळपास सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा कॉंग्रेसची उमेदवारी संतोष रावत यांनाच मिळावी अशी असून, त्यासाठी ते जीवाचे रान करीत आहे.

संतोष रावत यांनी मागील दोन वर्षापासूनच तयारीला लागले आहेत.  विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि राज्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेकडे दोन वर्षाआधीच उमेदवारीची मागणी करीत त्यांचे सुचनेनुसार तयारी सुरू केली असल्यांचे बोलले जात आहे.  

घनश्याम मुलचंदानी, संतोष रावत यांचेशिवाय, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश मारकवार, भूमीपुत्र ब्रिगेडच्या डॉ. अभिलाषा गावतुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विनोद अहिरकर, डॉ. संजय घाटे, डॉ. विश्वास झाडे, पर्यावरणवादी बंडू धोत्रे यांनीही बल्हारपूर मधून कॉंग्रेसकडून उमेदवारी मागीतली आहे.


८ टिप्पण्या:

  1. पहले पेपर छपटे थे बाद मे बिकते थे अभि पहले बिकते है बाद मे छपटे

    उत्तर द्याहटवा
  2. पहले पेपर छपते थे बाद मे बिकते थे अभि पहले बिकते है बाद मे छपते ये news इस तरह का मॅसेज छोड रही है

    उत्तर द्याहटवा
  3. मा.राहुल गांधी सर खुद बोल रहे है जो OBC की बात करेगा वो इस देश पे राज करेगा ये दिखता नही या लिखना नही है

    उत्तर द्याहटवा
  4. अभि प्रतिभा ताई धानोरकर मॅडम ने संतोष रावत भाऊ को उनके गुरुवर्य को भाषण मे इतना सीधे शब्दो मे बोलणे पे भी नही समाजा होगा तो news देणे वाले और आप लगाने वाला का असली चेहरा OBC माफ नही करेगा

    उत्तर द्याहटवा
  5. *📍“Caste factor” बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातही virus व्हायरल?*

    ☞#𝗖𝗵𝗮𝗻𝗱𝗿𝗮𝗽𝘂𝗿𝗧𝗮𝗸
    ▬▬꧁ஜ۩۞۩ஜ꧂▬▬
    https://chandrapurtak.in/caste-factor-goes-viral-in-ballarpur-assembly-constituency-story-by-mahesh-panse/

    उत्तर द्याहटवा

झिंदाबाद!