विजय वडेट्टीवार यांचेकडून विद्यार्थ्यांना नोटबूक वितरण

सावली :- तालुक्यातील सावली केंद्रातील सावली, रुद्रापूर, कवठी, पारडी, सिंगापूर,चांदली बुज, खेडी या गावातील विदयार्थ्यांना आज नोटबूक वितरण करण्यात आले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विजयकिरण फाउंडेशन तर्फे विदयार्थ्यांना नोटबूक वितरणाचे काम सुरु असून आज सावली केंद्रातील सर्व खाजगी व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण करण्यात आले. माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, सावली शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार यांच्या मुख्य उपस्थितीत नोटबूकचे वितरण करण्यात आले.
नोटबूक वितरण करताना नगराध्यक्ष लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, युवा शहराध्यक्ष अमरदीप कोणपतीवार, नगरपंचायत सभापती प्रितम गेडाम, सीमा संतोषवार, प्रियंका रामटेके, नगरसेवक सचिन संगीडवार, नितेश रस्से, गुणवंत सुरमवार, नगरसेविका ज्योती गेडाम,, अंजली देवगडे, पल्लवी ताटकोंडवार, कविता मुत्यालवार, ग्राम काँग्रेस कमिटी रुद्रापूरचे अध्यक्ष खुशाल राऊत, शेतकरी राईस मिल सावलीचे अध्यक्ष मोहन गाडेवार, रवी गेडेकर, पुरषोत्तम पेंदाम, अतुल येल्लटीवार, ग्रामपंचायत सदस्या शुभांगी संतोषवार, विलास येंगटीवार, शिलाताई गुरुनुले, आकाश खोब्रागडे, निखिल दुधे,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!