खेडी येथे एक कोटी रुपयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती सभागृह मंजूर

 

सावली -  खेडी येथे एक कोटी रुपयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती सांस्कृतिक सभागृह  विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार व माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले आहे. 

      सावली तालुक्यातील खेडी येथे धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागंतर्गत राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार व धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांनी पाठपुरावा करून खेडी येथे एक कोटी किंमतीचे सांस्कृतिक सभागृह मंजूर केले आहे. यामुळे धनगर समाज संघर्ष समितीचे नागपूर विभाग अध्यक्ष डॉ. तुषार मर्लावार, माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, सोमेश्वर कंचावार, राजू कंचावार, नागेश ओगुवार, परशुराम मर्लावार, मारोती कंकलवार, पुरुषोत्तम नेरडवार, दिलीप कंचावार, संजय मर्लावार यांनी आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!