शासकीय जागेवर अतिक्रमण करणे भोवले - मंगरमेंढा येथील सरपंच अपात्र


सावली - शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी मंगरमेंढा येथील सरपंच गुरुनाथ मिसार यास अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी दोषी ठरवत एका आदेशान्वये सरपंच पद रद्द केले आहे. 

       मंगरमेंढा ग्रामपंचायतीच्या 2021 च्या निवडणुकीत बहुमत प्राप्त करीत गुरुनाथ मिसार हे सरपंच पदावर विराजमान झाले. मात्र ते अनेक वर्षांपासून वनविभागाच्या जागेवर अतिक्रमन करून पीक घेत असल्याने रामदास सेमाजी गंडाटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपात्र करण्याबाबत तक्रार दाखल केली. तहसीलदार सावली व वनविभाग सावली यांनी दाखल केलेल्या अहवालात अतिक्रमन असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४ (ज-४) नुसार सरपंच गुरुनाथ मिसार यांचे सरपंच पद रद्द केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!