वरोरा तालुक्यातील भानुसखिंडी मुंडा येथे बंधारा,कॅनल बांधकाम करा

जिल्हाध्यक्ष प्रहार शेरखान पठाण यांची जिल्हाधिकारी, क्षेत्र संचालक ताडोबा यांना निवेदनातून मागणी

तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प लगत अर्जुनी,तूकुम कोकेवाडा येथील शेतकरी अनेक वर्षापासून भानुसखिंडी मुंडा येथील पाणी शेती पिकासाठी वापरत असून या परिसरात बंधारा, कॅनलचे काम अपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.अर्जुनी, तुकुम, कोकेवाडा येथील शेतकरी भानुसखिंडी मुंडा जंगल परिसरातील पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हजारो हेक्टर मध्ये शेतात धान पिके शेतकरी घेत असतात या ठिकाणी नेहमीच बारमाही पाणी असून उन्हाळ्यामध्ये होत असलेल्या पाणी टंचाईच्या सुद्धा  परिसरातील जनतेला मोठा प्रमाणात फायदा होत असुन श्रमदानातून कॅनलची दुरुस्ती करून दरवर्षी शेतकरी शेती पिकांसाठी पाणी आणत असतात, कॅनलला ठीक ठिकाणी भगदाड पडलेले असून या ठिकाणी पक्का बंधारा, कॅनलचे बांधकाम झाल्यास शेतकऱ्यांना बारमाही उत्पन्न घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. भानुसखिंडी मुंडा येथे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची पातळी नेहमी वाढत असल्यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात पूराचा फटका बसत असतो शेती पिके उध्वस्त होत असतात, त्यामुळे या ठिकाणी पक्का बंधारा,तसेच कॅनलचे बांधकाम केल्यास शेतकऱ्यासहित गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होण्यास मदत होणार आहे त्यामुळे याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन काम पूर्ण करण्याची मागणी जिल्हाधिकारी, क्षेत्र संचालक अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा यांना प्रहार अध्यक्ष शेरखान पठाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!