श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर दहीहंडी स्पर्धा संपन्न
शेवटी दहीहंडीच फुटली नाही
नगर परिषद सक्सेना प्राथमिक शाळेची परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - भंडारा जिल्ह्यातील पवनी शहराची ओळख विदर्भाची काशी म्हणून आहे.पवनी शहरामध्ये स्थानिक गोकुळ मित्र मंडळाने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर दिनांक.२७ ऑगस्टला सक्सेना नगर परिषद प्राथमिक शाळेच्या भव्य प्रांगनामध्ये दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण सात मंडळांनी आपले नाव नोंदवले होते त्यातील पाच मंडळांनी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्यात अयशस्वी ठरले. आयोजक मंडळ व स्पर्धकांच्या संमतीनुसार बक्षिसाची रक्कम सम प्रमाणात वाटप करण्यात आली. या स्पर्धेच्या निमित्ताने आर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता प्रेक्षकांनी याचा आस्वाद घेत नृत्य केले. आमदार शेवटपर्यंत न थांबल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. पवनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश ब्राह्मणे यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख होता सदर कार्यक्रम घेताना नगर परिषद पवनी अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना व शालेय व्यवस्थापन समिती च्या पदाधिकाऱ्यांना कुठलीही माहिती व लेखी परिपत्रक न देता नगर परिषद पवनीने सदर कार्यक्रमाला परवानगी दिली तरी कशी ? लहान मुलांच्या खेळण्याच्या मैदानावर चिखल व माती यामुळे होणाऱ्या नुकसानाला नगर परिषद जबाबदार राहणार काय ? असा सवाल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखर जीभकाटे व पालकांनी उपस्थित केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!