झाडीबोली शब्दकोशाचे चंद्रपुरात प्रकाशन
झाडीबोली शब्दकोश महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनमोल ठेवा - ज्येष्ठ साहित्यिक नामदेव माळ
महाराष्ट्राच्या पूर्व भागात चंद्रपुर , गडचिरोली , भंडारा , गोंदिया या चार जिल्ह्यात व त्याच्या सीमावर्ती भागात झाडीबोली बोलली जाते . या बोलीतील शब्द महाराष्ट्राच्या संस्कृतीत उजेडात आणण्यासाठी अरुण झगडकर आणि लक्ष्मण खोब्रागडे यांनी चार वर्षे संशोधन करून झाडीबोली शब्दकोश तयार केला . त्या शब्दकोषाचे प्रकाशन चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे , पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक नामदेव माळी पुणे , राज्यस्तरीय मार्गदर्शक माजी विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे सातारा व चंद्रपूरचे उपशिक्षणाधिकारी श्रीनिवास कांबळे , विस्तार अधिकारी धनराज फटींग यांचे हस्ते करण्यात आले .
हा शब्दकोश महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनमोल ठेवा असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक नामदेव माळी यांनी सांगितले . सर्वांनी या क्षणाचे साक्षीदार झाल्याचा आनंद व्यक्त केला . यावेळी अरुण बावणे , निखिल तांबोळी , संगीता मॅडम , प्रशांत भंडारे , डॉ. अल्का ठाकरे , विजय भोगेकर व जिल्हाभरातील शेकडो शिक्षक उपस्थित होते .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!