विजय वडेट्टीवार यांची बदलेली भुमिका स्वागतार्ह
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची बदलेली भुमिका स्वागतार्ह
राज्यात बदलापूर लैंगीक शोषणाचे प्रकरणावरून रणकंदन माजले आहे. कलकत्ता पाठोपाठ पुरोगामी महाराष्ट्रात अशी घटना उघडकीस आल्यांने समाजमन सुन्न झाले आहे. या प्रकरणात सरकारने गुन्हा दाखल करण्यास वेळकाढू पणा केल्यांने, नागरीक संतप्त झालेत, राज्यभर आंदोलने, मुक निदर्शने, मेणबत्ती रॅली सुरू आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बदलापूर प्रकरणात सरकारला चांगलेच धारेवर धरले, सरकारच्या नेमक्या चुकीवर बोट ठेवून, महिला अत्याचाराचे विरोधात त्यांनी ठोस भूमिका घेतली.
नेते कुठल्याही पक्षाचे असो, सत्ताधारी असो कि, विरोधक! त्यांनी महिलांच्या सन्मानासाठी, त्यांच्या आत्मरक्षणासाठी उभे झालेच पाहीजे. त्यांचेवरील अत्याचाराविरोधात जाब विचारून, महिला बालीका यांचे सरंक्षण केले पाहीजे, हीच भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली व या प्रकरणावरून त्यांनी महिलांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलदृष्ट्या पाहण्यांची घेतलेली भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे. नाम. विजय वडेट्टीवार यांचे भूमीकेचे स्वागत करतांना, चंद्रपूर जिल्हयातील अशाच लैंगीक छळाची कहाणी स्मृतीपटलावर ताजी होत आहे.
काय आहे राजूरा प्रकरण?
पाच वर्षापूर्वी, चंद्रपूर जिल्हयातील राजूरा तालुक्यातील 17 आदिवासी शाळकरी मुलींवर कॉंग्रेस नेत्यांच्या शाळेत लैंगीक अत्याचार झालेत. 6 एप्रिल 2019 रोजी घटना उघडकीस आली. आदिवासी विभागातील अधिकार्यांची राजूरा पोलिस स्टेशन येथे तब्बल सहा दिवसानी म्हणजे 12 एप्रिल रोजी एफ.आय.आर. नोंदविला. कुणीही काहीही थेट माहिती द्यायला तयार नव्हते, पालक चिंतेत, मात्र सारेच प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात असल्यांने, श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामी यांनी थेट हायकोर्टात प्रकरण नेले आणि हे प्रकरण चव्हाट्यावर आले. हे प्रकरण राज्यभर गाजत असतांना, चंद्रपूरातील एन.डी. हॉटेल मध्ये पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे नेते, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे दिवगंत खासदार बाळूभाउ धानोरकर यांनी 'पोक्सो कायद्याअंतर्गत मिळणार्या आर्थिक लाभासाठी आदिवासी पालकांकडून पोलिस स्टेशनला खोट्या तक्रारी देतात. अशा खोट्या तक्रारी देण्यांचा आदिवासींचा धंदाच झाला आहे' घृणास्पद आणि संतापजनक व्यक्तव्य केले होते.
त्यांचे वक्तव्यामुळे गदारोळ झाल्यांने त्यांनी नंतर सावरासावर करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पर्यंत त्यांचे आॅडीओ—व्हिज्यूअल समाजमाध्यमात चांगलेच वायरल झाले होते.
या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले, पोलिस स्टेशन चंद्रपूर येथे तक्रारी दाखल झाल्यात, गुन्हेही दाखल झालेत. चंद्रपूरात नाम. विजय वडेट्टीवार यांचे पुतळ्यास 'जोडा मारो' आंदोलनही गाजले होते. याच दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे मतदार संघातील पाथरी येथे, त्यांचेच शेजारील नागभीड तालुक्यातही बालींकावरील लैंगीक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या होत्या. यावर त्यावेळी विरोधीपक्ष नेते काही बोलले नाही. या पार्श्वभूमीवर मात्र बदलापूर प्रकरणात त्यांनी लैंगीक शोषण झालेल्या बालीकेच्या बाजूने घेतलेली निश्चितच स्वागतार्ह आणि महिलांचा सन्मान वाढविणारी आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!